दिवाळीनिमित्त ऑनलाइन शुभेच्छांची धूम 

दिवाळीनिमित्त ऑनलाइन शुभेच्छांची धूम 

पुणे : व्हॉट्‌सऍपवरील नवे दिवाळी स्टिकर्स असो वा फेसबुकवरील जीआयएफ...इन्स्टाग्रामवरील माय स्टोरी असो वा हाइकवरील अनोखे स्टिकर्स...अशा विविध माध्यमातून नेटिझन्स आपल्या आप्तेष्टांना आणि मित्र-मैत्रिणी दिवाळीच्या शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. दिवाळीचा प्रकाशोत्सव सुरू झाल्याने शुभेच्छांचा वर्षावही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. कुणी व्हिडिओतून तर कोणी फेसबुक लाइव्हवरून...कोणी छायाचित्रांतून तर कोणी माय स्टोरीद्वारे दिवाळीनिमित्त एकमेकांना सदिच्छा देत आहेत. त्यात फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपवरील ऑनलाइन ग्रीटिंग कार्डद्वारेही आपल्याजवळील व्यक्तींना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. 

घरापासून दूर असलेल्या नातेवाइकांना आणि मित्र-मैत्रिणींना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी सध्या सोशल मीडिया साइट्‌स वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यात व्हॉट्‌सऍप, फेसबुक आणि हाइकवरील नव्या स्टिकर्स फंक्‍शनची धूम पाहायला मिळत असून, प्रत्येकाकडून शुभेच्छा देण्यासाठी या अनोख्या स्टिकर्सचा वापर होत आहे. कुठेतरी हा नवा फंडा प्रत्येकाच्या पसंतीस उतरत आहे. विशेष म्हणजे या स्टिकर्सचा उपयोग तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही मोठ्या आनंदाने करत आहेत. वसुबारसपासून ते भाऊबीजेपर्यंत...प्रत्येक दिवशीचे खास स्टिकर्स उपलब्ध असल्याने या स्टिकर्सचा सध्या ट्रेंड आहे. जीआयएफ, छोटे व्हिडिओ, छायाचित्रे या माध्यमातूनही नेटिझन्स एकमेकांना शुभेच्छा देत आहेत. याशिवाय आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा देण्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारेही शुभेच्छा देण्यात येत आहेत. तसेच, फेसबुक लाइव्ह आणि इन्स्टा लाइव्हद्वारे दिवाळीचे प्रत्येक अपडेट्‌स दिले जात आहेत. 

खास पोस्टर्सद्वारे शुभेच्छा 
"माझ्या व संपूर्ण कुटुंबाकडून तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा' अशा आशयाचे पोस्टर्स सध्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहायला मिळत आहे. स्वतःचे नाव, वेगळ्या पोझमधील छायाचित्र आणि खास संदेश...अशा आशयाच्या पोस्टर्सची धूम असून, याद्वारे स्वतःच्या कंपनीचे किंवा संस्थेचे प्रसिद्धी करण्याचा फंडाही अजमावण्यात येत आहे. 

"मी आपल्या नातेवाइकांना व्हॉट्‌सऍप, फेसबुकद्वारेही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे व्हॉट्‌सऍपवरील स्टिकर्सचा नवीन पर्याय अतिशय चांगला असून, वेगळ्या पद्धतीने आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा देण्याचा हा फंडा मला खूप आवडला. तसेच, फेसबुक लाइव्ह आणि व्हिडिओ कॉलद्वारेही मी मित्र-मैत्रिणींना दीपावलीच्या सदिच्छा दिल्या.'' 
- सोनल गजवानी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com