रात्रप्रशालेतील विद्यार्थ्यांसाठी 'महाकरियर पोर्टल' विषयक मार्गदर्शन

poona-night-school
poona-night-school

पुणे - दिवसा कष्ट करून रात्रीच्या वेळेत शिक्षण घेणाऱ्या पूना नाईट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना करिअरच्या संधीची ओळख करून देण्यात आली. राज्य सरकारने सुरु केलेल्या “महाकरियर पोर्टलबाबत” इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे, पुणे महानगरपालिका, तसेच पूना नाईट हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हे सत्र घेण्यात आले. 'गुगल मीट'च्या माध्यमातून हे मार्गदर्शन करण्यात आले. त्यात १२५ पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यावेळी परिषदेचे संचालक दिनकर पाटील, सहसंचालक दिपक माळी आदी उपस्थित होते. समुपदेशक रूपाली माळी यांनी ऑनलाइनच्या माध्यमातून महाकरियर पोर्टलवर लॉग इन कसे करायचे ? अभ्यासक्रमाचा शोध कसा घ्यायचा ? पोर्टल वरील महत्वाच्या नोंदी व तारखा कशा पहायच्या याचे प्रात्यक्षिक केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com