'सकाळ विद्या'चे 'स्टडी ऍब्रॉड' ऑनलाइन मार्गदर्शन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

शुक्रवारपासून सकाळ विद्या : स्टडी ऍब्रॉड ऑनलाइन समिट 2019'
परदेशातील अभ्यासक्रमाची व प्रवेशप्रक्रियेची ऑनलाइन माहिती व मार्गदर्शन

पुणे : परदेशात शिक्षण घेणे महत्त्वाचे आणि फायदेशीर ठरत आहे. परदेशी शिक्षण घेण्याची इच्छा अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असते. परंतु आपल्याला हव्या असलेल्या शैक्षणिक संधी कुठे मिळतील, त्यासाठी काय करावे लागेल यासाठी मात्र अनेक प्रश्‍न असतात. मुलांना अनेक गोष्टी माहीत असतात पण त्या माहितीला विश्‍वासार्हता नसते.

पालकांच्या मनातही अनेक संभ्रम असतात. त्यातून पुण्या-मुंबईसारख्या शहरातील मुलांना माहितीचे अनेक स्रोत असतात पण इतर भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती कुठे मिळेल असे प्रश्‍न असतात, त्यावर तज्ज्ञांचे मत काय हे कळत नाही. त्यामुळे सकाळ माध्यम समूहाने पुढाकार घेतला आहे. सकाळ घेऊन आले आहे शनिवार (ता.20) ते मंगळवार ता. (23) रोजी www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर 'स्टडी ऍब्रॉड' हे ऑनलाइन मार्गदर्शन. रजिस्ट्रेशन विनामूल्य आहे.समिटमध्ये असणार आहे तज्ज्ञांचे ऑनलाइन मार्गदर्शन तसेच प्रश्‍नोत्तरे असणारे फेसबुक लाइव्ह आहे. शनिवार ता. 20 ते मंगळवार ता. 22 व्हिडिओ टेलिकास्ट असणार आहे. 23 तारखेला लाइव्ह सेशन असणार आहे.

शुक्रवारपासून सकाळ विद्या : स्टडी ऍब्रॉड ऑनलाइन समिट 2019'
परदेशातील अभ्यासक्रमाची व प्रवेशप्रक्रियेची ऑनलाइन माहिती व मार्गदर्शन

परदेशातील शिक्षणाच्या विविध संधी, तेथील प्रवेश प्रक्रिया यासंबंधी मार्गदर्शन करणारे हे ऑनलाइन समिट असून यामध्ये परदेशातील विविध शैक्षणिक पर्यायाची माहिती व मार्गदर्शन असणार आहे. हे सगळ्यांना विनामूल्य आहे. या समिट मध्ये सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन आवश्‍यक आहे. रजिस्ट्रेशन विनामूल्य आहे. रजिस्ट्रेशन फॉर्म पोर्टलवर आहे. तो भरावा ज्यांनी रजिस्ट्रेशन केले त्यांना व्हिडिओ अपलोड झाले की मेल येतील, फेसबुक ग्रुपमध्ये इन्व्हाइट केले जाईल. महत्त्वाचे म्हणजे रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या सोयीनुसार, वेळेनुसार ते बघता येतील.
परदेशातील स्कॉलरशिप कुठल्या आहेत. अमेरिका, युरोप, रशिया , आशिया इथे कुठली विद्यापीठे आहेत. जाण्यासाठी किती खर्च येतो ? तिथे जाण्यासाठी काही स्कॉलरशिप आहेत का ? या विषयी याक्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करतील . तसेच कुठले अभ्यासक्रम, कुठल्या स्कॉलरशिप या विषयीही त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. ऑनलाईन इव्हेंटसाठी आमचा फेसबुक ग्रुप https://www.facebook.com/groups/SakalVidya जॉईन करा. या ग्रुपवर आपण आपले प्रश्‍न मांडु शकता.

सकाळ विद्या : स्टडी ऍब्रॉड ऑनलाइन समिट 2019
कधी : शनिवार (ता.20 जुलै ) ते मंगळवार ता. (23 जुलै)
रजिस्ट्रेशन: विनामूल्य
रजिस्ट्रेशन: www.vidyasakal.com या वेबपोर्टलवर
फेसबुक ग्रुप : https://www.facebook.com/groups/SakalVidya

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online guidance of study Abroad by Sakal Vidya