हडपसरच्या कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाइन अभिमुखन व पालक सभा | Online Meeting | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हडपसरच्या कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाइन अभिमुखन व पालक सभा

हडपसरच्या कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ऑनलाइन अभिमुखन व पालक सभा

हडपसर - ऑफलाईन परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या वाटचालीसाठी फायदेशीर आहे. त्यासाठी शिक्षण जरी ऑनलाइन असले तरी ही परीक्षा ही ऑफलाईनच होणे योग्य राहील. असे मत पुणे विभागाच्या टेक्निकल विभागाचे सहाय्यक संचालक मारुती जाधव यांनी व्यक्त केले.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात प्रथम वर्ष पदविका विद्यार्थी व पालक यांच्यासाठी ऑनलाइन अभीमुखन व पालक सभा घेण्यात आली, त्यावेळी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

हेही वाचा: ‘सिंबायोसिस’च्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त साहित्य महोत्सवाची मेजवानी

यावेळी प्राचार्या अश्विनी शेवाळे यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा व विद्यार्थ्यांच्या निकालाचा आढावा दिला. महाविद्यालयाचे नियम, शिस्त आणि शैक्षणिक विभागाची माहिती प्रा. योगिता शिंदे यांनी, ट्रेनिंग प्लेसमेंट या विभागाची माहिती प्रा. किर्ती बेलसरे यांनी, स्कॉलरशिप विभाग व महिला तक्रार निवारण समिती याबाबत प्रा. कोमल नवले यांनी, सांस्कृतिक विभाग व त्यात घेतलेले कार्यक्रमाची माहिती प्रा. पूजा कटके यांनी, महाविद्यालय सध्या ऑफलाइन चालू झाले असून त्यात घेण्यात येणारी सावधानता संदर्भातील माहिती प्राध्यापक देवयानी किर्वे यांनी, कार्यालयीन विभाग व स्कॉलरशिप विभागाची माहिती संजय बारगळ, सौदामिनी देशमुख यांनी तर महाविद्यालयातील ग्रंथालय विभागाची व त्यातील पुस्तके, संदर्भ पुस्तके, इतर वाचन साहित्य व ऑनलाईन डेटाबेस याची माहिती शीला कुदळे यांनी दिली.

प्रथम वर्ष विभागातील विद्यार्थी कु. संघप्रिया पैठणे, कनिष मेहता, पालक वसंत धमाल व सारिका मेहता यांनी मनोगते व्यक्त केली. युनुस सय्यद, अभिषेक मेदनकर, रुपाली मुळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

loading image
go to top