पिंपरी चिंचवड शहरात ऑनलाइन शिधापत्रिकेला प्राधान्य

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 डिसेंबर 2019

तत्काळ शिधापत्रिका मिळावी म्हणून नागरिक एजंटांना पैसे देतात. परंतु, आता ऑनलाइनचा चांगला पर्याय उपलब्ध झाल्याने त्यावर जास्तीत जास्त नोंदणी करावी, त्यामुळे नागरिकांनी आमिषाला बळी पडू नये. यापुढे एजंटांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार आहोत.   
- दिनेश तावरे, नायब तहसीलदार, निगडी

ही कागदपत्रे आवश्‍यक
अर्जदाराचा पासपोर्ट फोटो
उत्पन्नाचा दाखला (५९ हजारांच्या आत) 
बॅंक पासबुक

पिंपरी - शहरात ऑनलाइन शिधापत्रिकेला चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत तब्बल ७१ हजार नागरिकांनी शिधापत्रिका काढल्या आहेत. यामुळे एजंटांना आळा बसला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

‘ई-पीडीएस’ या प्रणालीद्वारे ऑनलाइन शिधापत्रिका काढण्यात येत आहेत. यासाठी नागरिकांना अन्नसुरक्षेचा अर्ज भरून द्यावयाचा आहे. तसेच, कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर ४५ दिवसांच्या आत शिधापत्रिका मिळत आहे. यासाठी कोणतेही शुल्क नाही. आतापर्यंत ‘अ’ विभागांतर्गत ३६ हजार २७८ व ‘ज’ विभागांतर्गत ३५ हजार १६९ शिधापत्रिका नागरिकांनी काढल्या आहेत. 

हेही वाचा : भाजपमधून एकदा सर्व ओबीसी आमदार बाहेर पडले की... : प्रकाश शेंडगे

मार्च २०१८ पासून ऑनलाइन पद्धतीने कामकाज सुरू झालेले आहे. नागरिकांनी अवघ्या दीड वर्षात डिजिटल शिधापत्रिकेला प्राधान्य दिलेले आहे.

एजंटांना तंबी
ज्यांना ऑनलाइन प्रणाली माहीत नाही, ते अधिकृत महा ई-सेवा केंद्र किंवा अन्नधान्य वितरण कार्यालयात जाऊन शिधापत्रिका काढतात. तेथे एजंट दिशाभूल करून नागरिकांकडून पैसे उकळतात. या एजंटांना काही प्रमाणात आळा घालण्यासाठी निगडीतील अन्नधान्य वितरण कार्यालयाने एजंटांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांना लेखी स्वरूपात कारवाईची तंबी दिली आहे. तरीही त्यांना कारवाईचा धाक उरलेला नाही. याकरिता नागरिकांनी ऑनलाइन शिधापत्रिकेला प्राधान्य द्यावे, अशी माहिती निगडीतील ‘अ’ व ‘ज’ परिमंडळ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या सुविधाही उपलब्ध
रेशनकार्ड प्रकार       रुपये

दुबार शिधापत्रिका    ४०
शुभ्र नवीन              ५० 
शुभ्र दुबार              १००
पिवळी दुबार           १०


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: online ration card Priority in pimpri chinchwad