#OnlineServices का ठोकले महा ई-सेवा केंद्राला टाळे (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

ऑनलाइन मिळणारे दाखले 

 • दरपत्रक आणि कालावधी
 • प्रतिज्ञापत्र ३३ रुपये ६० पैसे - एक दिवस
 • उत्पन्न प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे - १५ दिवस
 • रहिवासी प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे - १५ दिवस
 • वय/अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे - १५ दिवस
 • ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे - १५ दिवस
 • नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे - २१ दिवस
 • ऐपतदार दाखला ३३ रुपये ६० पैसे - २१ दिवस
 • महिला नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे - २१ दिवस
 • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रमाणपत्र ३३ रुपये ६० पैसे - २१ दिवस
 • जात प्रमाणपत्र ५७ रुपये २० पैसे - ४५ दिवस

पुणे - दाखला काढण्यासाठी जास्त पैसे उकळणाऱ्या शुक्रवार पेठेतील महा-ई-सेवा केंद्रावर शहर तहसीलदारांनी मंगळवारी छापा टाकून केंद्राला सील ठोकले.

तहसीलदार कार्यालयासमोरच (मामलेदार कचेरी) असलेल्या या केंद्रामध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याच्या कारणावरून ही कारवाई करण्यात आली. तसेच, हे महा-ई-सेवा केंद्र अधिकृत परवानाधारक मालकाऐवजी दुसरीच व्यक्‍ती चालवीत असल्याचेही समोर आले आहे.

आणखी बातम्या - भाजप नेत्याचे विधान खोडून काढण्याची फडणवीसांवर आली वेळ 

शहरात ६८ महा-ई-सेवा केंद्रे आहेत. त्यापैकी काही केंद्रांमध्ये उत्पन्न, रहिवासी, जातीच्या दाखल्यासह अन्य दाखले काढण्यासाठी नागरिकांकडून सरकारने निश्‍चित केलेल्या शुल्कापेक्षा जादा आकारणी केली जात असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांनी शहरातील महा-ई-सेवा केंद्रचालकांची २९ नोव्हेंबरला बैठक घेतली. या वेळी संबंधितांना नियमानुसार शुल्क घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, पूर्वसूचना देऊनही जादा शुल्क घेत असल्याच्या तक्रारीवरून या केंद्रावर छापा टाकण्यात आला. या केंद्रात दाखल्यासाठी तिप्पट-चौपट शुल्क घेत असल्याचे निदर्शनास आले.

आणखी बातम्या - पंकजा मुंडेंचा पुन्हा भाजपला धक्का पाहा काय केले?

दरपत्रकाचा फलक लावणे बंधनकारक असताना ते लावण्यात आले नव्हते. या केंद्रचालकाकडे गेल्या १२ वर्षांपासून केंद्र चालविण्याचा परवाना आहे. परंतु, दुसरीच व्यक्ती केंद्र चालवीत असल्याचे आढळून आले. प्रतिज्ञापत्रासाठी ३३ रुपये ६० पैसे दर आकारण्यात येतो. परंतु, या केंद्रचालकाकडून दीडशे रुपये आकारण्यात येत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

दाखल्यासाठी नागरिकांकडून जादा शुल्क आकारण्यात येऊ नये, अशा सूचना महा-ई-सेवा केंद्रचालकांना दिल्या आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावाने एजंटांनी जास्त पैशांची मागणी केल्यास नागरिकांनी तहसीलदार कार्यालयात तक्रार द्यावी. तसेच, नागरिकांनी जून-जुलै महिन्यात दाखले काढताना गर्दीमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी आत्ताच दाखले काढून घ्यावेत. 
- तृप्ती कोलते पाटील, तहसीलदार, पुणे शहर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Online Services mahaeseva center lock crime