राळेगण सिद्धी, हिवरे बाजार विसरा, आता ही 50 गावे पहा...

grampanchayat
grampanchayat

मंचर (पुणे) : ""आदर्श गाव राळेगण सिद्धी, हिवरे बाजार आता बस झालं. आदर्श गाव प्रकल्प व संकल्प योजनेतील पन्नास गावे स्वयंपूर्ण झाली आहेत. ही गावे राज्यातील इतर गावांना मार्गदर्शन करतील; अशी कामे त्यठिकाणी झाली आहेत,'' असे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी सांगितले. 

आदर्श गाव प्रकल्प समितीची राज्यस्तरीय आढावा बैठक नुकतीच ऑनलाइन झाली. या वेळी ते बोलत होते. मृदा, जलसंधारण व रोजगार हमी योजनेचे प्रधान सचिव नंदकुमार, कृषी आयुक्त नीरज कुमार, मृद संधारणचे संचालक डॉ. कैलास मोते, आदर्शगाव योजनेचे कृषी उपसंचालक गणेश तांबे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, आदर्श गावांचे सरपंच, ग्राम कार्यकर्ता व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते. 

पवार म्हणाले, ""आदर्श गाव योजनेत आपल्या गावाचे नाव आल्यानंतर बाहेर गावी गेलेले मजूर परत येऊ लागतात. महिला व युवकांचा सहभाग वाढतो. व्यसनमुक्तीसह ग्रामविकासाला चालना मिळते. हे या योजनेचे यश आहे.'' नंदकुमार म्हणाले, ""आदर्श गावांनी आजूबाजूची किमान दहा गावे आदर्श होण्यासाठी पुढाकार घ्यावा. इतर गावांना मार्गदर्शन करून त्यांना आदर्श होण्याची वाट दाखवावी. रोजगार हमी योजनेतील कामांच्या निधीत कोणतीही कपात करण्यात आली नाही.'' धीरज कुमार म्हणाले, ""आदर्श गावाच्या यशोगाथा शेतकरी मासिकात क्रमवार प्रसिद्ध केल्या जातील. आदर्श गाव भागडी (ता. आंबेगाव) यांसह यशस्वी आदर्श गावांना लवकरच भेटी देण्यात येतील.'' 

राज्यस्तरीय आदर्श गाव योजनेच्या कार्याध्यक्ष पदावर एक व्यक्ती 12 वर्ष अविरत काम करत राहणे. कामकाजात अपेक्षित यश मिळत राहणे. ही देशातील एकमेव दुर्मिळ घटना आहे. त्याबद्दल पोपटराव पवार यांचे मी अभिनंदन करतो. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक गावे स्वयंपूर्ण होतील, असा विश्वास आहे. 
-नंदकुमार, प्रधान सचिव, मृदा, जलसंधारण आणि रोजगार हमी योजना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com