ऑनलाइन कर सवलतीस कॉंग्रेस, मनसेचा विरोध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पुणे - महापालिकेचा मिळकत कर ऑनलाइन पद्धतीने भरणा करणाऱ्या नागरिकांना कराच्या रकमेत पाच टक्के सवलत देण्याचा प्रशासनाचा ठराव कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केल्यामुळे लांबणीवर टाकण्यात आला. 

पुणे - महापालिकेचा मिळकत कर ऑनलाइन पद्धतीने भरणा करणाऱ्या नागरिकांना कराच्या रकमेत पाच टक्के सवलत देण्याचा प्रशासनाचा ठराव कॉंग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विरोध केल्यामुळे लांबणीवर टाकण्यात आला. 

केंद्र सरकारच्या कॅशलेस धोरणाला पाठिंबा म्हणून अशी सवलत जाहीर करण्यात येत आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करून कॉंग्रेस- मनसेने त्याला विरोध केला. त्या वेळी पक्षाचे फारसे सदस्य उपस्थित नसल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रस्ताव पुढे ढकलला. भारतीय जनता पक्षाने या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, आबा बागूल, अविनाश बागवे, संजय बालगुडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किशोर शिंदे यांनी या ठरावाला विरोध केला. मिळकतकराचा ऑनलाइन पद्धतीने भरणा करण्याचे प्रमाण वाढत आहे, त्याला प्रोत्साहन म्हणून ही सवलत देण्यात येत आहे, असे प्रशासनातर्फे मिळकत कर विभागाचे प्रमुख सुहास मापारी यांनी स्पष्ट केले होते. 

भाजप आणि राष्ट्रवादीचे सदस्य नागरिकांना सवलत देण्याच्या बाजूने होते. तसेच आयुक्त कुणाल कुमार हेही प्रस्ताव मंजूर व्हावा म्हणून आग्रही होते. मात्र कराचा भरणा रोख पद्धतीने करणाऱ्या नागरिकांनाही सवलत द्यायला हवी, असे म्हणत कॉंग्रेस, मनसेने त्याला विरोध केला.

Web Title: Online tax benefit of Tax Congress, oppose MNS