ऑनलाइन चोरीस गेलेले चार कोटी रुपये परत 

ऑनलाइन चोरीस गेलेले चार कोटी रुपये परत 

पुणे - शहरामध्ये दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत असताना त्यामध्ये बॅंकेकडून येणारा ‘ओटीपी’ क्रमांक अन्य व्यक्तींना न सांगताही आर्थिक फसवणूक झालेल्यांची संख्या वाढत आहे. ‘ओटीपी’ न सांगता ऑनलाइन पैसे चोरीस गेलेल्यांचे तब्बल ४ कोटी १२ लाख रुपये सायबर गुन्हे शाखेने नुकतेच परत केले. याबरोबरच डेबिट/क्रेडिट कार्डचा वापर करून, फसवणूक झालेल्या नागरिकांनाही बुधवारी एक लाख २८ हजार रुपयांची रक्कम परत करण्यात आली.

नागरिकांकडून मोबाईल व इंटरनेट बॅंकिंग करताना त्यांची बॅंकविषयक माहिती चोरून फसवणूक होते. मात्र ऑनलाइन व्यवहार करताना बॅंकेचा ‘ओटीपी’ इतरांना न सांगताही स्कीमरच्या साह्याने कार्ड क्‍लोनिंग करून बॅंक खात्यातील रक्कम लंपास केली जाते. चतुःशृंगी पोलिस ठाण्यामध्येही दोन दिवसांपूर्वी याच पद्धतीने ड्रायफ्रूट विक्रेत्याने काही नागरिकांची साडेतीन लाख रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा नुकताच दाखल झाला आहे.

‘ओटीपी’ न देता फसवणूक झालेल्या व्यक्तींनी सायबर गुन्हे शाखेकडे तक्रार अर्ज केला होता. त्याची दखल घेऊन सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने बॅंकांशी पत्रव्यवहार केला. त्यामुळे त्यांची रक्कम मिळणे शक्‍य झाले. वर्षभरात फसवणूक झालेल्यांचे ४ कोटी १२ लाख रुपये परत मिळवून त्यांना देण्यात आले. दरम्यान, दीपिका कुमारी यांचे २६ हजार रुपये, तर सुमेद खिचा यांचे ३४ हजार आणि बालाजी सिंगनाथ यांचे ६७ हजार रुपये काढण्यात आले होते. पोलिसांनी बॅंकेशी पत्रव्यवहार करून, त्यांना त्यांची रक्कम मिळवून दिली. 

‘‘बॅंकेकडून आलेला ओटीपी आरोपींना सांगणाऱ्या व्यक्तींचे पैसे परत आणता येत नाहीत. मात्र ओटीपी न सांगता पैसे गेलेल्या व्यक्तींचे बॅंकांशी पत्रव्यवहार करून पैसे परत मिळविता येतात. मागील वर्षभरात आम्ही ४ कोटी १२ लाख रुपये परत मिळवून ते फसवणूक झालेल्यांना दिले.’’ 
-ज्योतिप्रिया सिंह, पोलिस उपायुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे शाखा.

सायबर गुन्हे शाखेकडील आकडेवारी
* दरमहा येणारे अर्ज - ४५०
* सायबर गुन्हे शाखेकडे आलेले अर्ज - ५३४७
* बॅंकेकडून आलेला ओटीपी इतरांना न सांगणारे नागरिक - २५३
* सायबर गुन्हे शाखेने बॅंकांकडून परत मिळविलेली रक्कम - ४ कोटी १२ लाख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com