पुण्यातील प्रतिबंधित क्षेत्रातील भाडेकरू, घरकाम करणाऱ्या व्यक्तींबाबत महत्वाचा निर्णय

मंगळवार, 30 जून 2020

प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) आणि नॉन कंटेनमेंट झोनमधील नियमावलीच्या संभ्रमातून काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सभासद आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा वाद होत आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता भाडेकरू, घरकाम करणाऱ्या किंवा इतर व्यक्तींना बंदी असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पुणे : प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) आणि नॉन कंटेनमेंट झोनमधील नियमावलीच्या संभ्रमातून काही गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सभासद आणि पदाधिकाऱ्यांमध्ये पुन्हा वाद होत आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता भाडेकरू, घरकाम करणाऱ्या किंवा इतर व्यक्तींना बंदी असेल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

महापालिका, ग्रामपंचायतीच्या प्रतिबंधित क्षेत्रात वैद्यकीय, आपत्कालीन सेवा, औषध विक्रीचे दुकाने आणि जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन) मध्ये प्रवेश करण्यास किंवा परिसरातून बाहेर पडण्यास बंदी आहे.

घरकाम करणाऱ्या व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर राहणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या घरी, घर मालकाची इच्छा असल्यास स्वेच्छेने काम करता येईल. परंतु प्रतिबंधित क्षेत्रात राहणाऱ्या व्यक्तींना प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील ठिकाणी घरकाम करण्यास परवानगी नाही.

प्रतिबंधित क्षेत्रामध्ये दूध, भाजीपाला, अत्यावश्यक सेवा देणारी वाहने पाण्याचे टॅंकर, रुग्णवाहिका, शववाहिका, अग्निशमन दलाचे वाहन, कचरा वाहतूक गाडी, त्यावरील कर्मचाऱ्यांना प्रतिबंधात क्षेत्रामध्ये प्रवेश करता येईल, अशी माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या मदतीकरिता लागणाऱ्या व्यक्ती, रुग्णसेवेसाठी मदतनीस व्यक्ती, हेल्पर, घरकाम करणारी व्यक्ती, वाहनचालक यांची मदत घेता येईल. तथापि, मदत करणारी व्यक्ती प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर राहणारी असावी.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केल्यानंतर 28 दिवसांच्या कालावधीत संबंधित गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि सेवा पुरविणारे कर्मचारी वगळता इतर व्यक्तीला बाहेर जाण्यास किंवा सोसायटीमध्ये येण्यास परवानगी नाही. घरकाम करणाऱ्या व्यक्ती आणि नवीन भाडेकरूंनाही प्रतिबंधित क्षेत्रात परवानगी देता येणार नाही. -सचिन बारवकर, उपविभागीय अधिकारी, हवेली

पुणे जिल्ह्यातील (ग्रामीण) एकूण कंटेनमेंट झोन : 316 पूर्ण झालेले कंटेनमेंट झोन : 183 
क्रियाशील कंटेनमेंट झोन : 133

हवेली उपविभागीय अधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशातील मुद्दे : 

- 65 वर्षांवरील व्यक्ती, अति जोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, वय वर्ष 10 पेक्षा कमी वयोगटातील मुले यांना अत्यावश्यक सेवा व वैद्यकीय कारणांशिवाय घराबाहेर जाता येणार नाही.

- प्रतिबंधित क्षेत्रात सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीतच दूध, भाजीपाला, फळे व इतर अत्यावश्यक सुविधा सुरु 

- गृहनिर्माण सोसायटीमध्ये रुग्ण आढळल्यास मायक्रो कंटेनमेंट झोन 28 दिवसांच्या कालावधीसाठी त्या सोसायटीपुरताच मर्यादित राहील.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा