फुकटे प्रवासी जोमात; तपासनीस ‘कोमात’

Ticket-Checker
Ticket-Checker

शहरात पीएमपीसाठी केवळ दोनच तिकीट तपासनीस
पिंपरी - शहरात पीएमपीच्या दररोज सातशे बस धावतात. यासाठी केवळ दोन तिकीट तपासनीस आहेत. परिणामी, फुकट्या प्रवाशांना आळा घालताना पीएमपीच्या नाकीनऊ येत आहे. त्यामुळे तोट्यात चाललेल्या पीएमपीला तिकीट तपासनीस कधी मिळेल, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

शहरातील पीएमपीच्या चार आगारांसाठी तब्बल ५० तिकीट तपासनिसांची गरज असून, सध्या केवळ दोनच कर्मचारी उपलब्ध आहेत. दापोडी ते तळेगाव हद्दीचा मोठा विस्तार झाला आहे. त्यानुसार विविध मार्गांवरून धावणाऱ्या बसची तपासणी करणे आवश्‍यक आहे. मात्र दररोज कोणत्या मार्गावर तपासणी करावी, याचा तपासनिसांना ताळमेळ घालणे अवघड होत आहे. तपासनिसांची संख्या अपुरी असल्याने नियंत्रकांवर तात्पुरता कारभार सोपविला जात आहे. दिवसेंदिवस प्रवाशांच्या संख्येत वाढ होत असल्याने वाहक व बसही वाढत आहेत. यावरच तपासनिसांची संख्या वाढवावी अशी मागणी होत आहे. 

सध्या दिवसाला पाच मार्गांवरील दहा बसच्या तपासणीनंतर केवळ एकाच फुकट्या प्रवाशांवर कारवाई होत आहे. अशा कारवाया महिन्याकाठी केवळ तीन होत आहेत. त्यातून अवघा एक हजार रुपयांचा दंड प्रशासनाकडे जमा होत आहे. त्यातही तिकीट न काढता वाहकाला ‘चकवा’ देणारेही आहेत.

आगारनिहाय बस 
१७० निगडी
१२० पिंपरी
११० भोसरी

पुण्यातील इतर आगारांतून पिंपरी-चिंचवडमध्ये धावणाऱ्या ३५० ते ४०० बस 
शहरातून व बाहेरून रोज ११ ते १२ लाख प्रवाशांची ये-जा
दहा बससाठी एका तपासनिसाची गरज   
पुणे शहरात केवळ चार तपासनीस

तपासनिसांसाठी सध्या दोनच वाहने आहेत. कारवाईसाठी ती तुटपुंजी आहेत. याबाबत बैठक घेऊन समस्या सोडविण्यात आल्या आहेत. चार डेपोंकरिता मार्गावर तपासणीसाठी मनुष्यबळ वाढविणे गरजेचे आहे. 
- अनंत वाघमारे, व्यवस्थापक, पीएमपी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com