ट्विटरवर सुरू झाला onlyMpsc हॅगटॅग; विभागस्तरीय भरतीला विरोध

onlympsc hashtag on twitter by students for government recruitment
onlympsc hashtag on twitter by students for government recruitment

पुणे : राज्य सरकारने विभाग स्तरावर शासकीय भरती करण्याचा निर्णय रद्द करून थेट एमपीएससी द्वारे भरती करावी. हा निर्णय न घेतल्यास २ मार्च पासून उपोषण सुरू केले जाणार आहे, असा इशारा एमपीएससी समन्वय समिती व एमपीएससी स्टुडंट्स राईट्सने दिला आहे.

राज्य सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी 
२४ फेब्रुवारी ते १ मार्च या दरम्यान सोशल मीडियावर मोहीम राबविली जाणार असून, यात रोज सकाळी ९.०० ते १०.०० आणि सायंकाळी ५.०० ते ६.०० या वेळेत हॅशटॅग #onlyMPSC याचा वापर करून फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलिग्राम सर्व ठिकाणी वापरला जाणार आहे.सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. परीक्षेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी व आपल्या सर्वांना न्याय मिळण्यासाठी या सर्व परीक्षा #महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी या सोशल कॅम्पेनिंग मध्ये सहभागी होऊन #onlyMPSC  हा ट्रेंड सर्वांनी चालूयात असे आवाहन महेश बडे यांनी केले आहे. जर सरकारने १ मार्च पर्यंत निर्णयात सुधारणा केली नाही तर २ मार्चपासून पुण्यामध्ये उपोषणाला सुरुवात होणार, असा इशारा बडे यांनी दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com