#OpenLibrary खुल्या वाचनालयाची संस्कृती

जीत ग्राउंड, कोथरूड : वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी तरुणांनी बसविलेले पुस्तकांचे कपाट.
जीत ग्राउंड, कोथरूड : वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी तरुणांनी बसविलेले पुस्तकांचे कपाट.

पुणे - वाचन संस्कृती कमी होत चालली आहे, त्यामुळे शहरातील तरुण- तरुणींनी सर्वांसाठी खुले वाचनालय सुरू केले आहे. 

‘वाचा आणि दान करा’ ही त्याची संकल्पना असून वाचनालय सर्वांसाठी मोफत आहे. कोथरूडमधील जीत ग्राउंड परिसरामध्ये या खुल्या वाचनालयाचे उद्‌घाटन शनिवारी झाले.

पुस्तके घेण्यासाठी आणि देण्यासाठी पहिले कपाट हे ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या नावाने येथे ठेवले आहे. या वेळी ‘रावण’ (राजा राक्षसांचा) या कादंबरीचे लेखक शरद तांदळे आणि ‘प्रतिपश्‍चंद्र’ कादंबरीचे लेखक डॉ. प्रकाश कोयाडे उपस्थित होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे, त्यामुळे पुस्तके वाचण्याची सवय कमी झाली आहे.

त्यामुळे हा उपक्रम सुरू केला आहे. मोफत वाचनालये असतील तर फावल्या वेळेत नागरिक त्याचा लाभ घेतील. त्यातून वाचन संस्कृती वाढण्यास हातभार लागेल, हा उपक्रमाचा उद्देश आहे. येथे विविध पुस्तके ठेवली आहेत. ती नागरिकांनी, तरुणांनी घ्यावी व वाचावी; तसेच पुस्तके दान करून या उपक्रमाला मदत करावी, असे आवाहनही केले आहे.

सध्या वाचन संस्कृती थोडीफार संपुष्टात येत असल्याचे जाणवले. कारणे कोणतीही असू शकतात; पण वाचन संस्कृती फोफावण्यासाठी आणि त्याचे वटवृक्षामध्ये रूपांतर करण्यासाठी निर्धार केला. ही चळवळ एका गटापुरती मर्यादित नसून ती लोकचळवळ बनवायची आहे, त्यातूनच नव्या पिढीला वाचनाचे महत्त्व समजेल.
- प्रियांका चौधरी, सदस्या, खुले वाचनालय चळवळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com