वाकड फाट्यावरील भुयारी मार्ग वाहतुकीस खुला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नवी सांगवी - औंध-रावेत बीआरटीएस रस्त्यावर वाकड फाट्यावर (पिंपळे निलख) वाय जंक्‍शन येथे बांधण्यात आलेल्या भुयारी मार्गाचे उद्‌घाटन सोमवारी (ता. ७) आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते झाले. 

या वेळी महापौर नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, महिला व बालकल्याण सभापती सुनीता तापकीर, ‘ड’ प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, नगरसेवक शत्रुघ्न काटे, आरती चोंधे, निर्मला कुटे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

१५.९९ कोटी रुपये खर्चून भुयारी मार्ग विकसित करण्यात आला असून, त्याची लांबी ४९० मीटर तर, रुंदी ७.५ मीटर आहे. प्रकल्पाची उंची ५.५ मीटर आहे. या प्रकल्पामुळे हे जंक्‍शन सिग्नल विरहित होणार असून, बीआरटी बस सेवा जलद होणार आहे. तसेच, वाकडहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनचालकांचा मार्ग यामुळे सुकर होणार आहे, असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

रँपचे उद्‌घाटन
भारतरत्न जेआरडी टाटा उड्डाणपुलाच्या पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, वाकड व हिंजवडीकडून पिंपरी-चिंचवड, मुंबईकडे जाणाऱ्या रॅंपचे उद्‌घाटनही आमदार जगताप यांच्या हस्ते झाले. या वेळी महापौर नितीन काळजे, एकनाथ पवार उपस्थित होते.

Web Title: Open subway route wakad