#शिक्षकभरती शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 ऑगस्ट 2019

पुणे - राज्यातील अकृषी विद्यापीठांमधील शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने त्यास परवानगी दिल्याने सार्वजनिक आणि सरकारमान्य अभिमत विद्यापीठे अशा एकूण १५ विद्यापीठांना ६५९ शिक्षक पदे भरता येणार आहेत. त्यामुळे पात्र उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. या निर्णयानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात १११ पदे भरली जाणार आहेत.

राज्यातील विविध खात्यांचे आकृतिबंध निश्‍चित होत नाहीत, तोपर्यंत पदभरतीवर निर्बंध घातले आहेत. उच्च शिक्षण खात्याच्या नियंत्रणाखालील विद्यापीठांमधील आकृतिबंध निश्‍चित व्हायचा आहे. (ताज्या बातम्या मोबाईलवर मिळवा, 'सकाळ'चे App डाऊनलोड करा) मात्र, या दरम्यान शिक्षक सेवानिवृत्त होत असल्याने रिक्त जागांचे प्रमाणही वाढत चालले आहे. याचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर होत आहे. विद्यापीठ अनुदान आयोगानेही रिक्त शिक्षक पदे भरण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पदभरतीस परवानगी दिली आहे.

 राज्यातील विद्यापीठांतील एकूण मंजूर पदसंख्येच्या ८० टक्के पदभरतीस मान्यता दिली आहे. तसेच, ज्या शैक्षणिक विभागातील आवश्‍यक पदे रिक्त असतील, तीच भरता येणार आहेत. यातही सहायक प्राध्यापकांची पदे भरण्यास विद्यापीठांना प्राधान्य द्यावे लागणार आहे. यासंबंधीचा आदेश जारी करताना राज्य सरकारने राज्यातील कोणत्या विद्यापीठांना किती शिक्षक पदांची भरती करता येईल, याचा तक्ताही दिलेला आहे. त्यानुसार, सर्व विद्यापीठांना आदेशाची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या आदेशानुसार राज्यात सर्वाधिक अध्यापक भरती मुंबई विद्यापीठात, त्या खालोखाल सावित्रीबाई पुणे विद्यापीठ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात होणार आहे. भरतीसाठी विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद यांच्या निश्‍चित केलेले निकषांचे पालनही करण्याच्या सूचना या विभागाने दिलेल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Open the way for teacher recruitment