भोसरीत महामार्गालगत खुलेआम दारू विक्री

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

पिंपरी - महामार्गापासून पाचशे मीटर अंतराच्या आत दारू विक्री करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातलेली आहे. तरीही पुणे-नाशिक महामार्गालगत भोसरीतील पीएमपी बसस्थानक परिसरातील छोटी हॉटेल्स, अंडाभुर्जी, मासेफ्राय व चायनीज सेंटरवर सर्रासपणे दारू विक्री सुरू आहे. त्यामुळे मद्यपींचा अशा प्रकारच्या खाद्य पदार्थांच्या हातगाड्या व टपऱ्यांकडे ओघ वाढला आहे. 

भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाण पुलाखाली, पदपथावर व अंकुशराव लांडगे नाट्यगृहाबाहेरील पटांगणावर सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत तळिरामांची मैफील भरलेली दिसते. अनेकदा त्यांच्यात वादही होतात. त्यातून बाटल्या फोडल्या जात असल्याने काचेचे तुकडे विखुरलेले असतात. याला सामान्य नागरिक त्रासले असून पोलिसही दुर्लक्ष करीत असल्याने तक्रार करावी कुणाकडे, असा प्रश्‍न त्यांना पडला आहे.

महामार्गालगतचा भोसरीतील पीएमपी थांब्याचा परिसर असंख्य टपऱ्यांनी व्यापलेला आहे. राजकीय पुढाऱ्यांच्या आशीर्वादाने येथे अवैध धंदे चालत असल्याचे नागरिक सांगतात. दारू प्रकरणावरून एका मासेफ्राय सेंटरमध्ये एका व्यक्तीचा रविवारी रात्री खून झाला. त्यामुळे बेकायदा दारू विक्रीचा प्रकार समोर आला आहे. याबाबत भोसरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप कुलकर्णी म्हणाले, ‘‘भोसरीतील पीएमपी बसथांब्याच्या परिसरात काही जण बाहेरून दारू आणून तेथील खाद्यपदार्थांच्या दुकानात बसून पीत असल्याची माहिती मिळाली आहे. लवकरच त्यावर कारवाई केली जाईल.’’

Web Title: open wine sailing at bhosari highway