'ओपनबार' म्हणजे दिव्याखाली अंधार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पिंपरी (पुणे) : बेकायदा धंद्यांना पायबंद घालून संबंधितांवर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य. मात्र, पोलिसांसमोरच असे अवैध धंदे चालत असतील, तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा तरी कोठे? याचा प्रत्यय पिंपरी चौकात रविवारी सायंकाळी गस्तीवर आलेल्या पोलिसांमुळे आला. चौकात मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर हातगाड्या, टपऱ्या व पदपथावर तळीराम मद्य पीत असतात. मात्र, पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप असतो. त्यामुळे गस्तीवरील दोन पोलिस गाडीतून उतरले. मद्याच्या दुकानात जात काही तरी चौकशी करू लागते.

पिंपरी (पुणे) : बेकायदा धंद्यांना पायबंद घालून संबंधितांवर कारवाई करणे हे पोलिसांचे कर्तव्य. मात्र, पोलिसांसमोरच असे अवैध धंदे चालत असतील, तर सर्वसामान्यांनी न्याय मागायचा तरी कोठे? याचा प्रत्यय पिंपरी चौकात रविवारी सायंकाळी गस्तीवर आलेल्या पोलिसांमुळे आला. चौकात मद्यविक्रीच्या दुकानांबाहेर हातगाड्या, टपऱ्या व पदपथावर तळीराम मद्य पीत असतात. मात्र, पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा नागरिकांचा आरोप असतो. त्यामुळे गस्तीवरील दोन पोलिस गाडीतून उतरले. मद्याच्या दुकानात जात काही तरी चौकशी करू लागते. मात्र, बाहेर हातगाड्यांवर मद्य पीत असलेले तळीराम व हातगाडी, टपरी चालकांमध्ये कोणतेच भीतीचे वातावरण नव्हते. 

हातगाडीच्या आसपास मोकळ्या दारूच्या बाटल्या पडून होत्या. तसेच, पोलिसांच्या गाडीच्या आसपास बेकायदा रिक्षाचालक प्रवासी कोंबून भरत होते. दरम्यान, एका मद्यदुकानातील व्यक्तीने पोलिसाचे नाव विचारून कोणाला तरी फोन लावला. बेकायदा, अवैध कृत्य करणाऱ्यांमध्ये पोलिसांची भीती आहे का. असा प्रश्‍न नागरिकांनी विचारला. 

अतिक्रमणांवर कारवाई हवी
स्टेशन रस्त्याला अनधिकृत बांधकामे व हातगाड्या, टपऱ्या वाढल्या आहेत. तेथे तळीरामांना सर्व सुविधा मिळतात. महापालिकेला याबाबत अनेकदा सांगूनही कारवाईत होत नाही. महापालिका आयुक्तांनी आपल्या कार्यालयापासून जवळच असलेल्या या मुख्य चौकाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत. 

नागरिक म्हणाले... 
प्रमिला कांबळे : संबंधित मद्यविक्रेता, हातगाड्याकडून पोलिस हप्ता घेत असल्याने कारवाई करण्यास ते धजावत नसल्याचा अनुभव आज आला. भारतीय राज्यघटनेनुसार भयमुक्त व सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे शासनाचे कर्तव्य आहे. मात्र, राज्यघटनेची अंमलबजावणी होताना दिसत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ठोस कारवाई करावी. 

बसथांब्यात, शेजारी हातगाड्यांवर दारूडे दारू पीत, सिगारेट ओढत असल्याने त्याचा महिलांना खूप त्रास व असुरक्षितता जाणवते. आपण महाराष्ट्र सोडून परप्रांतांत राहतो का, असा अनुभव येतो. 
- भारती साठे

हातगाड्या व रस्त्यावर मद्य पिणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. याबाबत पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. 
- गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ तीन

Web Title: 'Openbar' means darkness under diya