esakal | नवी मुंबई मेट्रोचे संचलन, देखभाल दुरुस्तीचे काम महामेट्रोकडे
sakal

बोलून बातमी शोधा

Mahametro

नवी मुंबई मेट्रोचे संचलन, देखभाल दुरुस्तीचे काम महामेट्रोकडे

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - नवी मुंबई (New Mumbai) मेट्रो प्रकल्पांतर्गत (Metro Project) वाहतूक संचालनाचे आणि देखभाल दुरुस्तीचे काम (Repairing Work) आता महामेट्रोकडे (Mahametro) सोपविण्यात आले आहे. त्यासाठी तयारी महामेट्रोने सुरू केली आहे. पुढील १० वर्षांसाठी हे कंत्राट महामेट्रोला सोपविण्यात आले आहे. (Operation Maintenance Repairing Navi Mumbai Metro to Mahametro)

नवी मुंबई मधील मेट्रो प्रकल्पाची जवाबदारी असलेल्या सिटी अँड इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (सिडको) महामेट्रोला मार्गिका क्रमांक १ वर मेट्रो गाडी चालवण्याची आणि देखभाल दुरुस्तीची जबाबदारी दिली आहे. तसेच याच मार्गाच उर्वरित काम पूर्ण करण्याचे कंत्राटही महा ट्रोला मिळाले आहे. महामेट्रो आणि सिडको दरम्यान याबाबत लवकरच करार होणार आहे.

हेही वाचा: 'समृद्ध जीवन'च्या महत्वाच्या कागदपत्रांचा मोठा साठा जप्त

राज्यात आता नागपूर, पुणे पाठोपाठ महामेट्रो नवी मुंबईत काम करणार आहे. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या पहिला टप्प्याचे काम सुमारे ९२ टक्के पूर्ण झाले असून दोन मार्गिकेवर प्रवासी सेवा सुरु आहे. उर्वरित दोन मार्गिकेचे काम या वर्षाअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. या खेरीज पुणे मेट्रो रेल प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम ५८ टक्के पूर्ण झाले आहे. पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गांवर मेट्रोची चाचणी झाली असून पुण्यात येत्या काही महिन्यात मेट्रो सेवा सरू होणार आहे. तसेच महामेट्रोने डिझाईन केलेल्या नाशिक मेट्रो प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील चार शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प राबवणार आहे. या शिवाय महामेट्रोने ठाणे आणि तेलंगणा राज्यातील वारंगल येथे मेट्रो प्रकल्पाकरता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला आहे.

loading image