विरोधकांनी वीस वर्षात स्वत:ची पोळी भाजून घेतली : आमदार भरणे

विरोधकांनी वीस वर्षात स्वत:ची पोळी भाजून घेतली : आमदार भरणे

वालचंदनगर : विरोधकांनी वीस वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेची विकासाची कामे करणे गरजेचे होते. मात्र त्यांनी स्वार्थी राजकारण करुन स्वत:ची पोळी भाजुन घेतली असल्याची टीका आमदार दत्तात्रेय यांनी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर केली.

निमसाखर (ता.इंदापूर) येथे जलपूजनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी भगवानराव रणसिंग, छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजित पाटील, विक्रम निंबाळकर, माजी उपसरपंच नंदकुमार पाटील, वीरसिंह रणसिंग, विनोद रणसिंग, पोपट कारंडे, अंकुश रणमोडे, संतोष रणमोडे, दिपक लवटे, अविनाश रणमोडे, तुषार घाडगे, इक्बाल शेख, कालिदास राऊत उपस्थित होते. 

यावेळी भरणे म्हणाले, निमसाखर परीसरातील विकास गेल्या वीस वर्षापूर्वीच होणे गरजेचे होते. या परीसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेवून बंधारे बांधणे गरजेचे होते. मात्र तसे काही झाले नाही. विरोधकांनी वीस वर्षाच्या कालावधीमध्ये स्वार्थी राजकारण करुन स्वत:ची पोळी भाजून घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातुन खासदार फंडातुन निमसाखर परीसरातील शेतकऱ्यांसाठी बर्गेवस्ती, लवटेवस्ती व हुंबेवस्ती येथे तीन साखळी बंधारे बांधल्यामुळे पाणी साचले असून या पाण्याचा उपयोग निमसाखर, रणगाव व वालचंदनगर परीसरातील शेतकऱ्यांना होणार आहे. या बंधाऱ्यातील जलपूजन आमदार भरणे यांच्या हस्ते करण्यात आले.

विरोधकांचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न...

गेल्या आठवड्यामध्ये निमसाखर परीसरातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या बंधाऱ्यातील पाण्याचे जलपुजन केले होते. यासंदर्भात भरणे यांनी सांगितले की, बंधारे आम्ही मंजूर करायचे, विकासकामे आम्ही करायची व श्रेय घेण्यासाठी जलपुजन दुसऱ्यांनी करायचे हे विरोधकांचे काम असल्याचे सांगून माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बंधाऱ्यातील पाणी पाहण्यासाठी येण्याचे आवाहन भरणे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com