गुजरातमध्ये लघुउद्योजकांना संधी - पटेल

Saurabh-Patel
Saurabh-Patel

पुणे - नवीन उद्योगांच्या गुंतवणुकीसाठी गुजरातमध्ये पोषक वातावरण आहे. गेल्या काही दशकांमध्ये गुजरात राज्य सरकारने उद्योगांसाठीच्या विविध धोरणांची यशस्वी अंमलबजावणी केल्यामुळे गुंतवणुकीमध्ये वाढ झाली आहे, असे मत गुजरातचे ऊर्जामंत्री सौरभ पटेल यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले. 

पुढील वर्षाच्या सुरवातीलाच ९ व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट २०१९चे आयोजन करण्यात येणार आहे. या गुंतवणूक परिषदेची सविस्तर माहिती देण्यासाठी या समिटमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पुण्यातील उद्योजकांकडून ‘रोड शो’चे आयोजन करण्यात आले होते. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पटेल यांनी व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटविषयीची संकल्पना मांडली. पटेल म्हणाले, ‘‘आफ्रिका खंडातील अनेक देश गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. याला गुजरातपुरतेच मर्यादित न ठेवता देशभर वाढवायचे आहे. यासाठी सर्व राज्यांनी यामध्ये सहभागी व्हावे.’’

ठळक मुद्दे
    लघुउद्योगांना चालना मिळणार 
    प्रत्येक राज्याला सहभागी करून घेण्याचा प्रयंत्न
    कापड उद्योग, खाण क्षेत्र, सेवाक्षेत्रात रोजगाराच्या संधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com