esakal | अजितदादांनी पुन्हा शब्द पाळला, आता या दोघांना दिली संधी 
sakal

बोलून बातमी शोधा

ajit pavar

माळेगाव साखर कारखान्यात राष्ट्रवादी काॅग्रेसची निर्विवाद सत्ता आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांच्यामार्फत

अजितदादांनी पुन्हा शब्द पाळला, आता या दोघांना दिली संधी 

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव (पुणे) : राज्यात आग्रगण्य समजल्या जाणाऱ्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी पणदरे येथील मंगेश प्रतापराव जगताप व गुनवडी येथील अॅड. वसंतराव बापूराव गावडे यांची नियुक्ती केली आहे. जगताप यांना पाच वर्षासाठी, तर गावडे यांना एक वर्षाचा कार्यकाळ ठरवून दिलेला आहे. 

झेडपीच्या शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा म्हणून शिक्षक करतात असं काही

माळेगाव साखर कारखान्यात राष्ट्रवादी काॅग्रेसची निर्विवाद सत्ता आहे. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप यांच्यामार्फत जगताप व गावडे यांची नावे सूचविली. त्यानुसार आज कारखान्याच्या संचालक मंडळात या नविन पदाधिकाऱ्यांचा ठराव बिनविरोध मंजूर झाला, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे व उपाध्यक्ष तानाजी कोकरे यांनी जाहिर केली. 

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान, चार महिन्यांपूर्वी माळेगाव कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक पार पडली होती. त्यावेळी राष्ट्रवादीच्या निळकंठेश्वर पॅनेल निवडून येण्यासाठी मंगेश जगताप यांचे व त्यांच्या कार्यकर्त्यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले होते. त्यांचे बंधू बाबा जगताप यांनीही विरोधकांच्या पॅनेलमधून निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. या बाबी विचारात घेत अजित पवार यांनी मंगेश जगताप यांना पाच वर्षासाठी काम करण्याची संधी देवून आपला शब्द खरा केला. वसंतराव गावडे हे राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून पराभूत झाले होते. त्यांना या वेळी एक वर्षासाठी संधी देण्यात आली आहे.