पदविकेसाठी बुधवारपर्यंत  अर्ज करण्याची संधी 

पदविकेसाठी बुधवारपर्यंत  अर्ज करण्याची संधी 

पुणे - बारावीनंतर फार्मसी, सरफेस कोटिंग टेक्‍नॉलॉजी याबरोबरच हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग टेक्‍नॉलॉजी या पदविका अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षातील प्रवेशासाठी बुधवारपर्यंत (ता. 19) अर्ज करता येणार आहेत.  या प्रवेशप्रकियेअंतर्गत अर्जाच्या पडताळणीची मुदतही 19 जूनपर्यंतच आहे. त्यानंतर गुरुवारी (ता. 20) गुणवत्ता यादी जाहीर होईल. अंतिम गुणवत्ता यादी 24 जूनला जाहीर होईल. ही प्रवेशप्रक्रिया तीन फेऱ्यांमध्ये पूर्ण होणार आहे. 

अशी असेल प्रवेशप्रक्रिया 
पहिली फेरी 

- प्रवेशासाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : 29 जून 
- महाविद्यालयांचे पर्याय भरणे : 25 ते 27 जून 
- प्रोव्हिजनल ऍलॉटमेंट जाहीर करणे : 29 जून 
- प्रवेश निश्‍चित करणे : 1 ते 4 जुलै 
- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे : 1 ते 5 जुलै 

दुसरी फेरी 
- प्रवेशासाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : 6 जुलै 
- महाविद्यालयांचे पर्याय भरणे : 7 ते 9 जुलै 
- प्रोव्हिजनल ऍलॉटमेंट जाहीर करणे : 11 जुलै 
- प्रवेश निश्‍चित करणे : 12 ते 15 जुलै 
- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे : 12 ते 16 जुलै 

तिसरी फेरी 
- प्रवेशासाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : 17 जुलै 
- महाविद्यालयांचे पर्याय भरणे : 18 ते 20 जुलै 
- प्रोव्हिजनल ऍलॉटमेंट जाहीर करणे : 22 जुलै 
- प्रवेश निश्‍चित करणे : 23 ते 26 जुलै 
- महाविद्यालयात जाऊन प्रवेश घेणे : 23 ते 27 जुलै 

प्रवेशाबाबत अधिक माहितीसाठी आवश्‍यक संकेतस्थळ : http://www.dtemaharashtra.gov.in 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com