"जेईई' व "नीट'बाबत विचारा लाइव्ह प्रश्‍न 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 एप्रिल 2018

पुणे - अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी "सकाळ विद्या'ने आयआयटीयन्स प्रशिक्षण केंद्राचे संस्थापक संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी आणली आहे. प्रा. मंगेशकर बुधवारी (ता. 11) सायंकाळी 5 वाजता "सकाळ विद्या'च्या फेसबुक लाइव्हमध्ये विद्यार्थ्यांना करियरविषयी मार्गदर्शन करणार आहेत. 

परीक्षांचे अर्ज भरण्यापासून ते "जेईई' व "नीट'सारख्या प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम, नेमका अभ्यास, परीक्षांची तयारी, अभ्यासाचे तंत्र, "सीईटी' व "जेईई' यांचा संयुक्तरीत्या अभ्यास. या परीक्षांची आठवी व अकरावीपासून तयारी अशा अनेक विषयांवर विद्यार्थी व पालकांच्या मनातील प्रश्‍नांना फेसबुक लाइव्हद्वारे थेट उत्तरे मिळविता येणार आहेत. 

"सकाळ विद्या' फेसबुक लाइव्ह 
बुधवार, ता. 11 
सायं. 5 वा. 
मार्गदर्शक : प्रा. दुर्गेश मंगेशकर 
"फेसबुक लाइव्ह'मध्ये सहभागी होण्यासाठी क्‍लिक करा : https://www.facebook.com/SakalNews/ 

Web Title: The opportunity to communicate directly with prof.Durgesh Mangeshkar on facebook live