पुरग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा; बीएसस्सी अॅग्री पदवीसाठी मिळणार संधी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

कृषी विद्यापीठांच्या बीएसस्सी अॅग्री या पदवी अभ्यासक्रमासाठी पूरस्थितीमुळे प्रवेश घेऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या प्रवेशाची फेरीत संधी मिळणार आहे.

पुणे : कृषी विद्यापीठांच्या बीएसस्सी अॅग्री या पदवी अभ्यासक्रमासाठी पूरस्थितीमुळे प्रवेश घेऊ शकले नाहीत, अशा विद्यार्थ्यांना तिसऱ्या प्रवेशाची फेरीत संधी मिळणार आहे.

प्रवेशाची पहिली फेरी झाल्सानंतर दुसऱ्या फेरीतील प्रवेश घेण्यासाठी 13 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत उद्या संपत आहे. राज्यातील अनेक भागांत पूरस्थिती कायम आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी त्यांचे प्रवेश निश्चित करू शकलेले नाहीत. अशा विद्यार्थांना तिसऱ्या फेरीत प्रवेशाची संधी मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे अधिकारी हरिहर कौसडीकर म्हणाले, "प्रवेशाची तिसरी फेरी 16 ऑगस्टला आहे. या फेरीची यादी प्रसिद्ध होईल, त्यावेळी पूरस्थितीमुळे नॉट रिपोर्टेड राहिलेल्या म्हणजे प्रवेश निश्चित करू शकले नाहीत अशा सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी संधी मिळेल. याकाळात विद्यार्थी त्याचा प्रवेश मोबाइलवरूनही निश्चित करू शकेल. त्यानंतर 28 ऑगस्टपर्यंत त्याने कागदपत्रे आणि शुल्क जमा करायचे आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opportunity to get admission for BSc degree to students affected by flood