शेतकरी आणि बाजारपेठांमधील दरी कमी करण्याची संधी

जनार्दन दांडगे
सोमवार, 16 जुलै 2018

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नवे तंत्रज्ञान पोचविण्याची आवश्‍यकता आहे. शेतीमालाच्या असमतोल उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी आणि बाजारपेठ यामध्ये असणाऱ्या दरीचा फायदा समाजातील काही घटक घेत असतात. ही दरी कमी करण्याची संधी कृषी व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना आहे, असे प्रतिपादन सातारा मेगा फुडपार्कचे उपाध्यक्ष विजयकुमार चोळे यांनी केले.
 

लोणी काळभोर - शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत नवे तंत्रज्ञान पोचविण्याची आवश्‍यकता आहे. शेतीमालाच्या असमतोल उत्पन्नामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकरी आणि बाजारपेठ यामध्ये असणाऱ्या दरीचा फायदा समाजातील काही घटक घेत असतात. ही दरी कमी करण्याची संधी कृषी व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना आहे, असे प्रतिपादन सातारा मेगा फुडपार्कचे उपाध्यक्ष विजयकुमार चोळे यांनी केले.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी, आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या राज मेमोरियल सभागृहात शेतकरी आणि बाजारपेठ व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळेते विजयकुमार चोळे बोलत होते.

यावेळी एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड, चन्नई येथील नॅचरल सलून आणि स्पाचे सीईओ सी. के. कुमारवेल, न्याती ग्रुप पुणेचे एच आर उपाध्यक्ष गणेश शिरसीकर, मिलिनियम इंजिनिअरिंगचे संचालक एम. बी. नांबियार, कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका सुनीता मंगेश कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, कुलसचिव डॉ. महेश देशपांडे आदी उपस्थित होते.

चोळे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने वाढवण्यासाठी फूड पार्क महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या फूड पार्कमुळे पाच हजार लोकांना रोजगार मिळणार असून, तब्बल 25 हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे फायदा होणार आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासाठी अऩेक ठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प उभे करत आहेत. या फूड पार्कमुळे उद्योजकतेला पुन्हा एकदा चालना मिळेल. रोजगार निर्मितीला नेहमीच प्राधान्य या प्रकल्पामुळे राहणार आहे. कृषी व्यवस्थापनाची पदवी व पदवी प्रदान करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असे फुडपार्क मोठी संधी निर्माण करणारे ठरणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

 सी. के. कुमारवेल यावेळी बोलतांना म्हणाले की, विद्यार्थ्यांनी प्रथम आपल्यातील क्षमता ओळखावी. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याची तयारी असावी. यासाठी मेहनत आणि कष्ट घेण्याची तयारी विद्यार्थ्यांनी दाखविल्यास यश नक्कीच पदरात पडेल. महिलांनी आता घरातून बाहेर पडून उद्योग क्षेत्रात करिअर करण्याचे धाडस करावे. प्रत्येक महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: The opportunity to reduce the gap between farmers and market