इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या उद्घाटनाला सुप्रिया सुळेंना आमंत्रण नसल्याने राष्ट्रवादीचा निषेध

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या उद्घाटनाला सुप्रिया सुळेंना आमंत्रण नसल्याने राष्ट्रवादीचा निषेध

बारामती (पुणे) : इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे उद्घाटन आज (ता. 1) बारामतीत झाले खरे मात्र खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर नमूद केले नाही व त्यांना या कार्यक्रमास बोलावले नाही या मुद्यावरुन राष्ट्रवादीने आज निषेधाचा पवित्रा घेतला.

राज्यसभेचे खासदार अमर साबळे व नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांच्या उपस्थितीत आज या बँकेचे उद्घाटन झाले. मात्र लोकसभेच्या विद्यमान खासदार या नात्याने सुप्रिया सुळे यांचे नाव निमंत्रणपत्रिकेवर नमूद करणे गरजेचे होते, ज्या मतदारसंघातून त्या निवडून गेल्या आहेत, त्यांच्याच मतदारसंघातील केंद्र शासनाच्या विभागाच्या कार्यक्रमाला त्यांना निमंत्रित केले नसल्याचा आज राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष अमर धुमाळ तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी निषेध केला. 

खासदार अमर साबळे यांना आमंत्रित करण्याबाबत आमचा कोणताही आक्षेप नाही, मात्र सुप्रिया सुळे यांचे नाव जाणुनबूजुन डावलून यात राजकारण करण्याचा प्रयत्न पोस्ट पेमेंट बँकेच्या व्यवस्थापनाच्या वतीने करण्यात आला आहे. या बाबत नेमका कोणी हा उद्योग केला व कोणाच्या सांगण्यावरुन विद्यमान खासदारांचे नाव वगळण्यात आले याची माहिती लोकांपुढे यायला हवी अशी मागणी संभाजी होळकर व अमर धुमाळ यांनी आज केली. खालच्या पातळीवर जाऊन केंद्र सरकारचे विभागही आता राजकारण करु लागल्याचेच हे निदर्शक असल्याचे नमूद करत त्यांनी या घटनेचा निषेध नोंदविला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com