कोणासाठी होतोय ‘सीएए’ला विरोध - सुनील देवधर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

देशावर खूप मोठे ओझे झालेल्या बांगलादेशी घुसखोरांना वाचविण्याचा प्रयत्न म्हणून सुधारित  नागरिकत्व कायद्याला (सीएए) काही जण विरोध करीत आहेत. या घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी मोदी आणि शहा कटिबद्ध असून, नागरिकांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केले.

पुणे - देशावर खूप मोठे ओझे झालेल्या बांगलादेशी घुसखोरांना वाचविण्याचा प्रयत्न म्हणून सुधारित  नागरिकत्व कायद्याला (सीएए) काही जण विरोध करीत आहेत. या घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी मोदी आणि शहा कटिबद्ध असून, नागरिकांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि पद्मावती प्रतिष्ठान यांच्या वतीने पद्मावती बनहट्टी यांच्या स्मृतीनिमित्त देवधर यांचे नागरिकता संशोधन कायदा या विषयावर व्याख्यान झाले. सोसायटीच्या परिषद आणि नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष महेश आठवले, नियामक मंडळाचे सदस्य आदेश गोखले, बनहट्टी प्रतिष्ठानच्या कौमुदी बनहट्टी या वेळी उपस्थित होत्या.

पुण्यात मसाज सेंटरच्या नावाखाली चालायचे सेक्स रॅकेट; पोलिसांचा छापा

देवधर म्हणाले, ‘‘हिंदू बहुसंख्य असलेल्या आपल्या देशात अल्पसंख्याकांवर कधीच अन्याय झाले नाहीत. दुसऱ्या धर्माचा दुःस्वास करायला आम्हाला शिकवले नाही. मुस्लिमांनी या देशाच्या श्रद्धास्थानांवर आकमण करून त्यांचे मॉडेल प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले. परंतु, त्यांना यश आले नाही. उलट सहजीवनाद्वारे इस्लामला आत्मसात करण्याचे काम हिंदूंनी केल्याचे इतिहास सांगतो. तरीही, हिंदूंना जातीयवादी ठरविले जाते. हिंदूंना धर्मनिरपेक्षता शिकविण्याची गरज नाही.’’

२००२ मध्ये राज्यसभेत भाषण करताना खासदार डॉ. मनमोहनसिंग यांनी सीएएच्या बाजूने भाषण केले होते. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाने सीएएचे समर्थन केले होते. मग आत्ताच सीएएला विरोध का केला जात आहे, असा प्रश्‍न देवधर यांनी उपस्थित केला.
बीएमसीसीचे उपप्राचार्य डॉ. आशिष पुराणिक यांनी स्वागत, प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन केले. डॉ. यशोधन महाजन यांनी परिचय करून दिला. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Opposition to CAA for whom sunil devdhar