विरोधी पक्षनेतेपदावर आता भाजपचाही दावा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

पुणे - महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावर भारतीय जनता पक्षानेही गुरुवारी दावा केला. दरम्यान, याबाबत शुक्रवारी निर्णय घेण्याचे सूतोवाच महापौर प्रशांत जगताप यांनी केले आहे. 

पुणे - महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावर भारतीय जनता पक्षानेही गुरुवारी दावा केला. दरम्यान, याबाबत शुक्रवारी निर्णय घेण्याचे सूतोवाच महापौर प्रशांत जगताप यांनी केले आहे. 

कॉंग्रेसचे सहा सदस्य पक्षाबाहेर पडल्यामुळे कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेतेपद जाण्याची चिन्हे आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला होता. परंतु त्यांच्या तीन नगरसेविकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गुरुवारी प्रवेश केला. त्यामुळे कॉंग्रेसची सदस्य संख्या 23 झाली असून, मनसेची 24 झाली आहे. तर भारतीय जनता पक्षात 26 सदस्य आहेत. त्यामुळे भाजपचे महापालिकेतील गटनेते गणेश बिडकर यांनी विरोधी पक्षनेतेपद भाजपला मिळावे, यासाठी महापौर जगताप यांना गुरुवारी पत्र दिले. याबाबत बिडकर म्हणाले, ""कॉंग्रेस, मनसेची सदस्य संख्या कमी झाली आहे. त्यामुळे महापालिकेत राष्ट्रवादीनंतर भाजपच आता मोठा पक्ष ठरला आहे. परिणामी, या पदावर नैसर्गिकरीत्या भाजपचा दावा निर्माण झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने हे पद भाजपला द्यावे.'' दरम्यान, या पत्रावर शुक्रवारी निर्णय घेणार असल्याचे महापौर जगताप यांनी म्हटले आहे. 

Web Title: Opposition leader in the BJP's claim