पुण्याच्या विकासाला भाजपकडून खीळ; विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांची टीका 

पुण्याच्या विकासाला भाजपकडून खीळ; विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांची टीका 

पुणे - पुणेकरांना "स्मार्ट सिटी'चे स्वप्न दाखवत सत्तेत आलेल्या भाजपने शहर "स्मार्ट' करणे तर सोडाच; पण विकासाला खीळ घातली आहे. केंद्र सरकारच काय; पण आता महापालिकेतील भाजप नेतेही स्मार्ट सिटीचा उल्लेख करण्यास घाबरू लागले आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. 

शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी "एचसीएमटीआर' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची निविदा काढली. परंतु, त्यामध्येही हे काम तत्कालीन भाजप सरकारच्या मर्जीतील विशेष कंपनीला मिळावे, यासाठी प्रयत्न केले गेले. चोवीस तास पाणी योजनेच्या निविदाही मर्जीतील कंपनीला मिळाव्यात, या पद्धतीने काढल्या गेल्या. कात्रज कोंढवा रस्ता, कचरा प्रक्रिया प्रकल्प, जलपर्णी काढण्याची कंत्राटे यातही पुणेकरांपेक्षा ठेकेदारांचेच हित जपण्यात भाजपची तीन वर्षांची सत्ता खर्ची पडली आहे, असेही धुमाळ म्हणाल्या. 

जायका कंपनीकडून केंद्र सरकारच्या माध्यमातून नदी सुधार योजनेसाठी 900 कोटी रुपयांची घोषणा झाली. या घोषणेला चार वर्षे उलटली. या योजनेच्या श्रेयासाठी भाजपच्या मंत्र्यांचे नागरी सत्कार झाले. परंतु, अद्याप या योजनेच्या कामाची सुरुवात झालेली नाही. दरवर्षीप्रमाणे यंदा जास्त पाऊस पडला आहे. तसेच, धरण क्षेत्रात पाणी असूनसुद्धा अपुरा पाणीपुरवठा केला जात आहे. हेसुद्धा भाजपचेच अपयश आहे, असाही आरोप त्यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com