मद्यविक्रीची बंदी उठविण्यास शिवसेनेचा आंदोलनाद्वारे विरोध 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

पुणे - महापालिकेच्या हद्दीतून जाणारे राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांच्या 500 मीटर परिसरातील मद्यविक्री राज्य सरकारने उठवू नये, या मागणीसाठी शिवसेनेने महापालिकेच्या आवारात गुरुवारी टाळ-मृदगांच्या गजरात भजन आंदोलन केले. "दिसताच दारू-बाटली ऐरणीवर', "रस्ते भकास, दारू- बाटलीचा विकास', "मुख्यमंत्री करणार का सुप्रीम कोर्टाचा अवमान' आदी घोषणा शिवसेना कार्यकर्त्यांनी या वेळी दिल्या. 

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावर 500 मीटर परिसरामध्ये मद्यविक्री आणि बारवर बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार, आता शहरांमधून जाणाऱ्या सर्व महामार्गांवरील मद्यविक्री बंद आहे. मद्यविक्रीवरील बंदी उठविण्याचा निर्णय घेण्यास महापालिकेने विरोध दर्शविला असून, त्या बाबतचा निर्णय पाटबंधारे विभागाने राज्य सरकारमार्फत घ्यावा, असे पत्र आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर पुण्यात दारूची दुकाने सुरू करण्यास शिवसेनेने महापालिकेत आंदोलन करून विरोध केला. त्यात भगव्या साड्या परिधान करून महिला, भगव्या टोप्या घालून कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, बाळा ओसवाल, अविनाश साळवे, विशाल धनवडे, नाना भानगिरे, संगीता ठोसर, पल्लवी जावळे, श्वेता चव्हाण, प्राची आल्हाट, तसेच अशोक हरणावळ, महिला आघाडीच्या राधिका हरिश्‍चंद्रे, मकरंद पेठकर, संजय वाल्हेकर, राजेश परदेशी आणि कार्यकर्ते त्यात सहभागी झाले होते. 

Web Title: Opposition by Shiv Sena's movement to lift the ban on liquor