वाहतुक कोंडीवर सार्वजनिक वाहतुक हा पर्याय- आयुक्त हर्डीकर

मिलिंद संधान
रविवार, 26 ऑगस्ट 2018

सरासरी एका नागरिकाच्या मागे एका वाहनाची भर पडत असते वाहतुक कोंडी वाढत चालली आहे. त्यातच, रस्ते रूंदीकरणावरही आपल्यावर बंधने आहेत. त्यामुळे ही कोंडी कमी करण्यासाठी जास्तित जास्त सार्वजनिक वाहतुक सेवेचा वापर नागरिंमधून वाढला पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी पिंपळे सौदागर येथे केले.

नवी सांगवी (पुणे)- सरासरी एका नागरिकाच्या मागे एका वाहनाची भर पडत असते वाहतुक कोंडी वाढत चालली आहे. त्यातच, रस्ते रूंदीकरणावरही आपल्यावर बंधने आहेत. त्यामुळे ही कोंडी कमी करण्यासाठी जास्तित जास्त सार्वजनिक वाहतुक सेवेचा वापर नागरिंमधून वाढला पाहिजे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी पिंपळे सौदागर येथे केले.

स्मार्टसिटी या उपक्रमातर्गत 'सार्वजनिक सायकल सेवा'चे उद्घाटन आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते व महापौर राहुल जाधव यांच्या उपस्थितीत सौदागरातील बाळासाहेब कुंजीर मैदानावर पार पडले, यावेळी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बोलताना आयुक्त हर्डीकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड, सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक नाना काटे, बापु काटे, नगरसेविका निर्मला कुटे उपस्थित होते.

स्मार्टसिटी या उपक्रमात एरिया बेस डेव्हलप्मेंट अंतर्गत महापालिकेने घेतलेल्या जनमत चाचणीतून पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव या दोन उपनगरांचा समावेश झाला आहे. त्याच धर्तीवर युलु या कंपनीच्या सहकार्याने महानगरपालिका सुरूवातीस या दोन उपनगरांच्या 34 भागांत सायकली उपलब्ध ठेवणार आहे. नागरिकांनी स्मार्टफोनद्वारा गुगल प्लेस्टोअर मधून युलु हे अँप डाऊनलोड केल्यावर त्यानंतर प्रती तीस मिनिटांकरीता पाच रूपये शुल्क आकारून या सायकल सेवाचा लाभ मिळणार आहे. 

आयुक्त हर्डिकर म्हणाले, "सार्वजनिक वाहतुक सक्षम करण्यासाठी आपण बीआरटी सुरू केली आणि मेट्रो नियोजित आहे. नागरीवस्तीतून बीआरटी बस थांब्याजवळ पोहचण्यास एक ते दोन किमी अंतर पडत असेल तर सार्वजनिक वाहतुक सेवेचा लाभ लोक घेणार नाहीत. त्याकरीता पादचाऱ्यांच्या सुविधा वाढविण्याबरोबर सायकल सेवाही उपलब्ध करून देणे गरजेचे आहे."

"पिंपरी चिंचवड शहराचा स्मार्टसिटीत समावेश होण्याअगोदर पासूनच नाशिक फाटा येथील भारतरत्न रतनटाटा उड्डाणपुलावरून पुढे पिंपळे सौदागर भागात आल्यावर नवी मुंबईत प्रवेश केल्याचा भास होत असे. एवढा विकास येथील आमदार लक्ष्मण जगताप व स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे झाल्याचे महापौर राहुल जाधव यांनी आवर्जुन सागितले."  

दरम्यान, पिंपळे गुरव येथील राजमाता जिजाऊ उद्यानाशेजारीही सायकल सेवा प्रकल्पाचे उद्घाटन आमदार जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी हा प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम यांच्यासह स्थानिक नगरसेवक उपस्थित होते.

Web Title: The option on traffic is public transport says Hardikar