Pune Rains : पुण्यात पुढील तीन दिवस 'ऑरेंज ऍलर्ट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 6 ऑक्टोबर 2019

पुणे : जिल्ह्यात पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. या दरम्यान जोरदार वारे वाहणार असून, विजांचा कडकडाट होणार आहे. अशा वातावरणात पावसाच्या जोरदार सरी पडतील, असा 'ऑरेंज ऍलर्ट' हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. 

पुणे : जिल्ह्यात पुढील तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार आहे. या दरम्यान जोरदार वारे वाहणार असून, विजांचा कडकडाट होणार आहे. अशा वातावरणात पावसाच्या जोरदार सरी पडतील, असा 'ऑरेंज ऍलर्ट' हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे. 

मुसळधार पावसाच्या सरींनी पुण्याला रविवारी दुपारी पुणेकरांना परत झोडपले. एकामागून एक पडलेल्या जोरदार सरींना कोथरूड, स्वारगेट, कात्रज, शिवाजीनगर, औंध भागातील रस्त्यांवर पावसाच्या पाण्याचे लोंढे वाहिले. पण, त्याच वेळी सिंहगड रस्त्यावरील धायरी, नांदेड भागात कडक ऊन जाणवत होते. मात्र, आणखी तीन दिवस ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

शहर आणि परिसरात सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता. सकाळी दहा वाजता 'ऑक्‍टोबर हीट' प्रमाणे ऊन लागत होतं. हवेत सध्या 80 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त आद्रता आहे. त्याच वेळी वाढलेली उष्णता या सर्वांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली. त्यामुळे स्थानिक पातळीवरील हवामानातील बदलांमुळे हा पाऊस पडत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

rain in pune
सकाळी कडक ऊन, दुपारी ढगाळ वातावरण आणि संध्याकाळी पाऊस असे, वातावरण सगल तिसऱ्या दिवशी पुणेकर अनुभव आहेत. रविवार हा सुटीचा दिवसही त्याला अपवाद ठरला नाही. 
दुपारी बारा वाजता उन्हाचा चटका वाढत असतानाच कोथरुडमध्ये जोरदार पावसाला सुरवात झाली. वादळी वाऱ्यासह हा पाऊस पडत होता. अर्ध्या तासामध्ये पडलेल्या पावसाने कोथरुडमधील रस्त्यांवरून पाण्याच्या लोंढे वाहू लागले. पावसाचा वेग इतका प्रचंड होता होता की, दुचाकी चालक रस्त्याच्याकडेला मिळेल त्या आडोशाला थांबल्याचे चित्र दिसत होते. चार चारी वाहने दिवे लावून गाड्या चालवत होते. 

rain in pune
पावसाचे पाणी रस्त्यांवर साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्यामुळे कर्वे रस्ता, लॉ कॉलेज रस्ता, सेनापती बापट रस्ता, लालबहाद्दुर शास्त्री रस्ता येथे वाहनांची कोंडी झाली होती. 
Pune Rains : पुण्यात आजही मुसळधार; 'या' भागात पावसाची हजेरी
rain in pune


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Orange alert for the next three days in Pune