केशरी शिधापत्रिकाधारकांनाही धान्य

केशरी शिधापत्रिकाधारकांनाही धान्य

पुणे : केशरी शिधापत्रिका असूनही सध्या बहुतांश कार्डधारकांना रेशनवर धान्य मिळत नाही. परंतु, प्राधान्य गटात नसलेल्या केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबांसाठी गोड बातमी आहे. शहरातील एक लाख केशरी शिधापत्रिकाधारकांना रेशनवर धान्य देण्याचा निर्णय अन्नधान्य पुरवठा विभागाने नुकताच घेतला आहे. 

गेल्या काही दिवसांत 45 हजार शिधापत्रिकाधारकांची नावे अन्नसुरक्षा योजनेत समाविष्ट केली असून, आणखी 55 हजार केशरी शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शहरातील बोगस शिधापत्रिकाधारकांचा शोध घेण्यासाठी अन्नधान्य पुरवठा विभागाने नुकतीच विशेष मोहीम राबविली. त्यात प्राधान्य गटात असूनही सलग तीन महिने धान्य न घेणाऱ्या केशरी शिधापत्रिकाधारकांचा शोध घेण्यात आला. अशा शिधापत्रिकाधारकांची नावे अन्नसुरक्षा योजनेतून वगळली आहेत; त्यांना देण्यात येणारा धान्याचा जो कोटा शिल्लक राहणार आहे, तेच धान्य आता प्राधान्य गटात नव्याने समाविष्ट झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना देण्यात येणार आहे. 

....असा घ्या योजनेचा लाभ 

अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी जुनी केशरी शिधापत्रिका आणि वार्षिक उत्पन्न मर्यादा 59 हजार रुपयांपर्यंत असणे आवश्‍यक आहे. पुरवठा विभागाच्या परिमंडळ कार्यालयात मोफत अर्ज मिळेल. अर्ज भरण्यासाठी कार्यालयीन खर्च नाही. अर्जासोबत वार्षिक उत्पन्नाचे घोषणापत्र हे साध्या कागदावर स्वत:च लिहून द्यावयाचे आहे. त्यासोबत जुन्या केशरी शिधापत्रिकेची झेरॉक्‍स आणि सर्वांच्या आधार कार्डच्या झेरॉक्‍स प्रती सोबत जोडाव्या लागतील. 

शहरातील शिधापत्रिकाधारकांची संख्या (मार्च 2019 अखेर) 

बीपीएल अंत्योदय केशरी (प्राधान्य गट) केशरी (प्राधान्य गट नसलेले) शुभ्र 
24,336 9,977 3,30,933 4,69,834 1,60,345 

एकूण शिधापत्रिकाधारक 
9 लाख 95 हजार 425 

कोणीही शिधापत्रिकाधारक धान्यापासून वंचित राहू नये, यासाठी पुरवठा विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना धान्य मिळत नाही अशा जुन्या केशरी शिधापत्रिकाधारकांनाच या अन्नसुरक्षा योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. अशा सुमारे एक लाख शिधापत्रिकाधारकांना धान्य उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट आहे. 

- अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com