
महिला झालेल्या तृतीयपंथीला दरमहा १२ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश बारामतीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्र. न. देशपांडे यांनी दिला. लिंग परिवर्तन केलेल्या घटनेच्या संदर्भातील हा खटला होता.
बारामती शहर - महिला झालेल्या तृतीयपंथीला दरमहा १२ हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश बारामतीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी प्र. न. देशपांडे यांनी दिला. लिंग परिवर्तन केलेल्या घटनेच्या संदर्भातील हा खटला होता.
एका पुरुषाची तृतीयपंथीशी मैत्री झाली, काही काळानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. संबंधित तृतीयपंथीने लिंग परिवर्तन करून घेत त्या पुरुषाशी लग्न केले. विवाहानंतर मात्र पतीने छळ सुरू केला, मारहाण केली, दुसरे लग्न केल्याची फिर्याद संबंधित महिलेने पोलिसांत दिली. या प्रकरणी पोलिसांनी कौटुंबिक हिंसाचाराचा संबंधितावर गुन्हा दाखल केला. तसेच, त्या महिलेने न्यायालयात अर्जाद्वारे पोटगीची मागणी केली होती. ही महिला मूळची तृतीयपंथी असल्याने कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत तिला अर्ज करता येत नसल्याचा मुद्दा तिच्या पतीच्या वकिलांनी मांडला. लिंग परिवर्तन केल्याने त्या महिलेला या कायद्याखाली दाद मागण्याचा अधिकार असल्याचे संबंधित
महिलेचे वकील ॲड. धीरज लालबिगे यांनी केला.