विकास कामात जुन्नर तालुका राज्यात अग्रस्थानी आणण्याचा ध्यास : आमदार शरद सोनवणे 

junnar
junnar

जुन्नर -  आमदार शरद सोनवणे यांचा  ४५ वा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. कांदळी ता.जुन्नर येथे झालेल्या तीन दिवस झालेल्या विविध मेळाव्यास शेतकरी, महिला व युवकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होतो. 

आमदार सोनवणे म्हणाले, विकासाच्या बाबतीत जुन्नरला  राज्यातील एक नंबरचा तालुका मी बनवणार असून तालुक्याचा विकास हाच माझा एकच ध्यास आहे. 

शेतकरी मेळाव्यात अभिनव फार्मर क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांनी शेतीविषयक मार्गदर्शन केले.  महिला सबलीकरण मेळाव्यास समाज प्रबोधनकार ह.भ.प.माधुरी इंदोरे-गाडे यांनी मार्गदर्शन केले. चाणक्य मंडळाचे डॉ.अविनाश धर्माधिकारी व   ह.भ.प माउली महाराज वाबळे यांचे युवक-युवतीं साठी  मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
तीन दिवस भव्य बंपर ड्रॉचे आयोजन सुद्धा  करण्यात आले होते. पिंपळवंडीचे शेतकरी  नितीन गोविंद शेळके यांना ट्रॅक्टर तर शिरोलीचे शेतकरी विष्णु तान्हाजी गायकवाड यांना दुचाकी, बोरीच्या रणाबाई गिरीधर जाधव या महिलेस चार चाकी गाडी मिळाली.

आमदार महेश लांडगे, शिवनेरी भुषण ह.भ.प. राजाराम महाराज जाधव, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, मंगलदास बांदल, दीपक हांडे, देवराम लांडे, कुलस्वामी सोसायटीचे शंकर पिंगळे, मनोज साळवी, अभिजित शेरकर, शरद वामन, भानुविलास गाढवे, सतिष कसबे, नगरसेवक जमीर कागदी, संदीप लेंडे, प्रदीप चाळक इत्यादी अनेक नेते, कार्यकर्ते व तरुणांनी आमदारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी व्यसन मुक्ती युवक संघ भांडुप यांच्या वतीने व्यसनमुक्तीवर अभियान राबविण्यात आले सुत्रसंचालन सचिन वाळुंज यांनी केले.

स्पर्धा परीक्षेसाठी जाताना अपघाता मध्ये आपले दोन्ही पाय गमवणारी जुन्नरची सायली ढमढेरेला तिच्या पायावर पुन्हा उभे राहण्यासाठी केलेल्या मदतीच्या आवाहनास यावेळी अनेकांनी मदत केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com