वाईन शॉप, बियर बार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

वाईन शॉप, बियर बार बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

लोणी काळभोर (पुणे) : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्हा ग्रामिण भागात वाईन शॉप, बियर बारसह सर्वच प्रकारची मद्य व ताडी विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. गणेश विसर्जन शांततेत व सुव्यवस्थेत पार पाडण्याकरिता तसेच जिल्ह्यासह शहारात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मुंबई दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 142 अन्वये (अनुज्ञप्त्या एफएल-2, एफएल-3, फॉर्म ई, ई-2, एफएलडब्ल्यू-2, एफएलबीआर-2, सीएल-3, टिडी-1) गणेश विसर्जणाच्या वेळी ड्राय डे जाहीर केला आहे. 

पुणे शहर व जिल्हात गुरुवारी (ता. 13) गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हा गणेशोत्सव सोहळा अकरा दिवस चालणार असुन, गणेेशोत्सव सोहळ्याची सांगता रविवारी (ता. 23) होणार आहे. विसर्जण मिरवणुकी दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित रहाण्याबरोबरच, विसर्जण शांततेत पार पडावे यासाठी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी एका पत्राकाद्वारे वरील निर्णय जाहीर केला आहे. 

जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकाप्रमाने, रविवारी (ता. 23) सकाळपासुन ते गणेश विसर्जन मिरवणुक संपेपर्यंत संपुर्ण जिल्हात दारु व ताडी विक्री बंद रहाणार आहे. तर शहरात मिरवणुकीच्या दिवसापासुन ते मिरवणुक संपेपर्यंतच्या काळात वाईन शॉप, बियर बारसह सर्वच प्रकारची मद्य व ताडी विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच कांही ठिकाणी गणेश विसर्जण पाचव्या, सातव्या व नवव्या दिवसी करण्यात येते. अशा ठिकाणी मिरवणुकीच्या दिवसी वरील निर्णय घेण्यात आला आहे.

वाईन शॉप, बियर बारसह सर्वच प्रकारची मद्य व ताडी विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबतचे लेखी आदेश पोलिस आयुक्त पुणे शहर पोलिस आयुक्त, पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्त, जिल्हा (ग्रामिण) पोलिस अधिक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्यासह सर्व खात्यांना दिला आहे. याबाबत चालढकल झाल्यास, वरील विभागांचे वरीष्ठ अधिकारी जबाबदार राहतील असेही जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकात स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com