पुणे शहरासह जिल्ह्यातील शाळांना सुटीचे आदेश जारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाने पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती तालुक्यात शाळा- महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश देऊनही शाळा- महाविद्यालयांनी परिपत्रक न मिळाल्याचे सांगत सुरूच ठेवल्या. या संदर्भात जिल्हाधिकारी राम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ''अतिवृष्टीमुळे सुटी जाहीर करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थानी शाळा महाविद्यालये बंद ठेवावीत.''

पुणे : काल रात्री अतिवृष्टी होऊनही जिल्हा प्रशासनाला उशिराने जाग येते आज सकाळी सुटी जाहीर केली. त्यात समन्वयाचा अभाव आणि शाळा महाविद्यालयांच्या अडेलतटटू भूमिकेमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांचे हाल झाले. 

अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाने पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती तालुक्यात शाळा- महाविद्यालयांना सुटी जाहीर केली. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आदेश देऊनही शाळा- महाविद्यालयांनी परिपत्रक न मिळाल्याचे सांगत सुरूच ठेवल्या. 
या संदर्भात जिल्हाधिकारी राम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे सुटी जाहीर करण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यामुळे शैक्षणिक संस्थानी शाळा महाविद्यालये बंद ठेवावीत. 

''जिल्हा प्रशासनाने आपत्कालीन स्थिती पाहता आज सकाळी सुटी जाहीर केली आहे. याबाबत लेखी परिपत्रक काढण्यात आले नाही.  परंतु परिपत्रक काढून शाळा महाविद्यालयांना पाठविण्यात येईल. तसेच, विद्यार्थ्याना घरी पाठविण्यात येईल''
- जयश्री कटारे, निवासी उपजिल्हाधिकारी
Order issued for School holiday in the district including Pune city


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order issued for School holiday in the district including Pune city