पुण्यातील तीन औषध कंपन्या बंद करण्याचा आदेश 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

पुणे - गुड मॅन्युफॅक्‍चरिंग प्रॅक्‍टिस (जीएमपी) प्रमाणे उत्पादन न करणाऱ्या पुण्यातील तीन औषध उत्पादन कंपन्या बंद करण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिले आहेत. या सर्व कंपन्या ऍलोपॅथीच्या औषधांचे उत्पादन करणाऱ्या आहेत. 

एफडीएच्या पुणे विभागाने 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या दरम्यान केलेल्या कारवाईच्या घेतलेल्या आढाव्यातून ही माहिती पुढे आली आहे. पुणे विभागात चार औषध निर्माण कंपन्यांचे परवाने रद्द करण्यात आले. त्यापैकी तीन कंपन्या पुण्यातील असल्याची माहिती एफडीएच्या पुणे विभागाचे सहआयुक्त विद्याधर जावडेकर यांनी दिली. 

औषध निर्माण कंपन्यांमधून नियमित तपासणी करण्यात येते. त्यात पुण्यातील तीन कंपन्यांमध्ये औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 नुसार आवश्‍यक जीएमपीनुसार उत्पादन होत नसल्याचे दिसून आले. जीएमपीच्या नियमामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या 29 तरतुदी आहेत. त्यानुसार कंपन्यांमधून औषध निर्माण होत नसल्याचे या तपासणीतून आढळून आले होते. हे सर्व दोष गंभीर आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. पुणे विभागातील सहा आणि पुण्यातील चार रक्त साठवणूक केंद्रांवर कारवाई करण्यात आली असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. 

तीन औषध कंपन्यांना सुरवातीला नोटीस बजावण्यात आली. कंपन्यांनी समाधानकारक बाजू न मांडल्याने त्यांचा औषध उत्पादनाचा परवाना रद्द करण्यात आला. 
- विद्याधर जावडेकर, सहआयुक्त, एफडीए, पुणे विभाग 

एफडीएची वर्षभरातील कारवाई (पुणे विभाग)  
परवाना कंपन्या 
निलंबित 23 
रद्द 04 

परवाना घाऊक औषध दुकाने 
निलंबित 44 
रद्द 21 

परवाना किरकोळ औषध दुकाने 
निलंबित 371 
रद्द 82

Web Title: The order to shut down three pharmaceutical companies in Pune