court
courtsakal

कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात प्रेयसीला वगळण्याचे आदेश

कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात पत्नीने पतीविरोधात दाखल केलेल्या खटल्यातून पतीच्या प्रेयसीला वगळण्यात यावे, असे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी दिले.

पुणे - कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात पत्नीने पतीविरोधात दाखल केलेल्या खटल्यातून पतीच्या प्रेयसीला वगळण्यात यावे, असे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी दिले. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याखाली पतीच्या प्रेयसीविरोधात तक्रार देता येत नाही. कायद्यामध्येही तशी तरतूद नाही. त्यामुळे खटल्यातून मला वगळावे, असा बचाव प्रेयसीच्या वकिलांना केला होता.

court
पुणे : उपायुक्ताच्या घरी सापडली सव्वा कोटींची रोकड

रेश्‍मा आणि राजेश यांचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. राजेश यांचे लग्नापूर्वीपासून आरती (सर्व नावे बदललेली) यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे रेश्‍मा यांना समजले होते. त्यानंतर पतीकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून पत्नीने हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत पती, सासरचे आणि आरती विरोधात तक्रार अर्ज दाखल केला. या गुन्ह्यातून वगळण्यासाठी आरती हिने तिचे वकील अॅड. पुष्कर पाटील व अॅड. अनुज मंत्री यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज केला. उच्च न्यायालयाच्या निकालांनुसार, पतीच्या मित्र-मैत्रिणींना किंवा प्रेयसीला प्रतिवादी करता येत नाही. शाब्दिक उल्लेख सोडल्यास आरती ही राजेशची प्रेयसी असल्याचा पुरावा रेश्‍मा यांनी दाखल केलेला नाही, असा युक्तिवाद अॅड. पाटील यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com