भारतीय ऑर्गन निघाले सातासमुद्रापार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

प्रथमच परदेशात निर्यात; संगीत शिक्षकाच्या पुढाकारामुळे वाद्याला ‘नवसंजीवनी’

पुणे - ऑर्गन हे वाद्य लुप्त होते की काय, अशी भीती असतानाच एका संगीत शिक्षकाने ऑर्गन वाद्य बनविण्यासाठी पुढाकार घेतला. इतकेच नव्हे तर ‘मेड इन इंडिया’ असे वाक्‍य असलेले हे वाद्य परदेशात पाठविण्याची तयारीही त्यांनी सुरू केली आहे. अशा प्रयत्नातून लुप्त होत चाललेल्या या वाद्याला ‘नवसंजीवनी’ मिळत आहे.

उमाशंकर दाते असे या संगीत शिक्षकाचे नाव आहे. ते मूळचे कोकणातील आडिवरे या गावचे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवानिमित्ताने सध्या ते ऑर्गन वाद्यासह पुण्यात आले आहेत. ऑर्गन या वाद्यासाठी दाते यांचे आजवरील प्रयत्न पाहून आर्य संगीत प्रसारक मंडळाने त्यांना मोफत स्टॉल पुरवला आहे. दाते म्हणाले, ‘‘ऑर्गन या वाद्यावरील माझे संशोधन, अभ्यास हे सॅनफ्रन्सिस्कोतील वादक डेव्हिड इस्टेस यांना ‘फेसबुक’वरून कळले. त्यानंतर त्यांनी माझा इकडचा पत्ता, दूरध्वनी क्रमांक शोधून काढला. काही महिन्यांपूर्वी ते सॅनफ्रन्सिस्कोवरून कोकणात मला शोधत आले, केवळ ऑर्गनसाठी. त्यांचा तेथे संगीताचा ग्रुप आहे. त्यासाठी त्यांना ऑर्गन हवी होती. साडेतीन फूट उंचीची, ३६ प्रकारचे टोन असलेली आणि त्यांची ज्या पद्धतीची हवी होती तशी मी ऑर्गन बनवली आहे. ती लवकरच सॅनफ्रन्सिस्कोला पाठवली जाईल. भारतात बनलेली आणि परदेशात चाललेली, ही पहिलीच ऑर्गन म्हणावी लागेल.’’

Web Title: The organ go to foreign