कमी खर्चात अन् कमी जागेत अभियंत्याने फुलविली सेंद्रिय शेती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

शेती करण्यामागचे खरे कारण म्हणजे साकेगावकर यांना दहा वर्षांपूर्वी मधुमेह झाला होता. त्यासाठी वेगवेगळी औषधे व उपचार घेतले. मात्र, तो बरा झाला नाही. अखेर गुजरात येथे घरगुती औषध तयार करून 'स्मूथी' (सर्व पालेभाज्या व इतर घटक) हा आयुर्वेदिक ज्यूस पिण्याचा एकाने सल्ला दिला. त्यामुळे त्यांचा मधुमेह काही कालावधीत गायब झाला. मात्र, त्यांना रासायनिक विरहित प्रक्रिया केलेला भाजीपाला हवा होता. शेवटी त्यांनी सेंद्रिय शेती पिकविण्याचा निर्णय घेतला. ​

पिंपरी : पेशाने अभियंता असूनही वयाच्या 59 व्या वर्षी सिमेंटच्या जंगलात सेंद्रिय शेती (ऑरगॅनिक) अनोख्या पद्धतीने फुलविली आहे. अवघ्या सहा महिन्यांत राहत्या घरातील टेरेसवर अत्यंत कमी खर्चात व कमी जागेत आधुनिक पद्धतीची शेती या अवलियाने केली आहे. त्याचबरोबर सर्वांना निरोगी आयुष्यासाठी कानमंत्रही दिला आहे.
Image may contain: plant and outdoor

720x720/84687787_2535031496815457_2933730389954396160_o.jpg?_nc_cat=100&_nc_ohc=AfLobSEo_HEAX_egvqe&_nc_ht=scontent.fdel1-3.fna&_nc_tp=6&oh=1808a553bd7646b83e1ecd64006a6f46&oe=5EC4095A" width="350" />

दहा वर्ष आधीच सौरडागांचे अनुमान करणे होणार शक्य ; 25 व्या चक्राला सुरवात 

शिवाजी साकेगावकर मूळ भुसावळचे. व्यवसायानिमित्त ते मोरवाडीत राहत आहे. सध्या त्यांनी टेरेसवरील दीड हजार स्क्‍वेअर फूट जागेचा शेतीसाठी वापर केला आहे. शेती करण्यामागचे खरे कारण म्हणजे साकेगावकर यांना दहा वर्षांपूर्वी मधुमेह झाला होता. त्यासाठी वेगवेगळी औषधे व उपचार घेतले. मात्र, तो बरा झाला नाही. अखेर गुजरात येथे घरगुती औषध तयार करून 'स्मूथी' (सर्व पालेभाज्या व इतर घटक) हा आयुर्वेदिक ज्यूस पिण्याचा एकाने सल्ला दिला. त्यामुळे त्यांचा मधुमेह काही कालावधीत गायब झाला. मात्र, त्यांना रासायनिक विरहित प्रक्रिया केलेला भाजीपाला हवा होता. शेवटी त्यांनी सेंद्रिय शेती पिकविण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इंटरनेटवरून त्याची माहिती घेतली. घरातील कचरा व टाकाऊ वस्तूंचाही त्यांनी खतासाठी वापर केला.

उन्हाळ्याच्या सुटीत शिक्षकांना काम 

शेती फुलविल्यापासून आतापर्यंत त्यांनी विकतचा भाजीपाला आणला नाही. पौष्टिक भाजीपाला मिळाल्याने सर्व कुटुंबीय सुखावले आणि आजारही पळाला. सेंद्रिय शेतीपासून ते ठिबक सिंचन व खतनिर्मितीचा त्यांनी दैनंदिन कामकाजातून अभ्यास केला. अशा पद्धतीचा उपयोगी पडणारा व आरोग्यवर्धक 50 ते 60 प्रकारचा भाजीपाला त्यांनी शेतात घेतला आहे. पाच टक्के पाणी वापरून पाण्याची बचत केली. गीर गायींचे गोमूत्र, शेणाचा सेंद्रिय शेतीसाठी वापर केला. घरगुती प्रक्रियेतून गांडूळ खत, शेणखत, जीवामृत, एन्झामाइज अशी खत व औषधपद्धती शेतीसाठी तयार केली. घरगुती नारळाच्या शेंड्याचे कोकोपीठ व काही प्रमाणात लालमातीचा शेतीसाठी वापर केला आहे.

Video : पोलिसांमधील कलाकारांनी केली छत्रपतींवरील महाआरतीची निर्मिती

ही घेतली पिके
कांदा, लसूण, बटाटा, गावरान टोमॅटो, मिरची, चेरी टोमॅटो, स्ट्रॉबेरी, ओवा, शतावरी, लेट्युस, सिमला मिरची, सिक्कीम सिमला, अडुळसा, पालक, शेपू, अंबाडी, अळू, ब्रोकोली, कोथिंबीर, मेथी, काळी हळद व पिवळी हळद, तुती, पुदिना, घोळाची भाजी अशी विविध प्रकारची लहान मोठी जंतुनाशक पिके घेतली आहेत. मूतखडा, मधुमेह व शरीरातील ब्लॉकेज अशा विविध आजारांवर सेंद्रिय शेतीतील पिके रामबाण औषध ठरली आहेत.
डीएमयू' नको; लोकल हवी 

"शिक्षण अभियांत्रिकीत झाले तरी शेतीची आवड आहे. माणूस करोडपती असूनही उपयोग नाही. जेव्हा आजार जडतात, त्यानंतर माणूस जागा होतो. त्यातूनच सेंद्रिय शेतीचे महत्त्व मला उमगले. मी दोन ते तीन एकर शेती प्लॉट घेऊन सेंद्रिय शेती करणार आहे. पौष्टिक आहारासाठी व आरोग्यासाठी सेंद्रिय शेतीबद्दल जागरूक व्हायला हवे. यासाठी मी प्रशिक्षणही घेत आहे व भविष्यात हायड्रोपोनिक तंत्रज्ञान वापरून शेती करणार आहे.''
- शिवाजी साकेगावकर, सेंद्रिय शेती मालक, पिंपरी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: organic farming in Low cost on terrace by the engineer in Pune