कोरोनाच्या काळात ‘विषमुक्त’ भोजन; कोठे ते पहा

Food
Food

पुणे - कोरोनाच्या काळात अनेकांच्या हाताचा रोजगार गेला. पण, काहींनी हार मानली नाही. प्रत्येकजण जगण्यासाठी धडपडत होता. आता तर हिंजवडीमधील माण गावामधील अभिनव महिला बचत गटाच्या महिलांनी कोरोनाला थोपविण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी विषमुक्त भोजनाचा उपक्रम घरगुती मेसद्वारे सुरू केला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी नैसर्गिक धान्य, कडधान्ये, पालेभाज्या आदी आहाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे औषधाचा खर्चही वाढू लागला. पण, अभिनव गट शेती गटाने याला फाटा देत सेंद्रिय शेती सुरू केली. त्याला दिवसेंदिवस प्रतिसाद मिळत गेला. नैसर्गिक अन्नाची गरज पाहता विषमुक्त भोजनाचा संकल्प अभिनव बचत गटातील महिलांनी केला.

याबद्दलचे सर्व प्रशिक्षण अभिनव ग्रुपचे प्रमुख ज्ञानेश्वर बोडके यांनी दिले. तसेच, त्यांना मार्केटिंग स्किलचेही धडे दिले असून गटशेतीतून २५ महिलांनी भोजन तयार करायला सुरवात केली आहे. 

अशी आहेत वैशिष्ट्ये....

  • पितळ किंवा मातीच्या भांड्यातील जेवण
  • दररोज पहाटे पाच वाजता स्वयंपाकाला सुरवात 
  • एका डब्यामध्ये तीन पोळ्या, एक भाजी, डाळ, सॅलेड, देशी गायीचे तूप व सेंद्रिय फळे
  • निगडी, सिंहगड रस्ता, वारजे परिसरात किचन
  • घरपोच भोजन देण्याची सुविधा

गेल्या दोन महिन्यांपासून मी हा टिफीन घेत आहे. कोणत्याही प्रकारचा त्रास मला झाला नाही. विशेष म्हणजे हे सगळे पदार्थ सेंद्रिय असल्याचा फायदा होत आहे.
- निखिल पाटील

आम्ही पूर्वी सेंद्रिय भाजीपाला घरी स्वतःसाठी आणत होतो. कालांतराने इतर आजूबाजूचे नागरिकही या भाजीपाल्याची मागणी करत होते. व्यवसायासाठी आम्हाला विषमुक्त भोजन ही संकल्पना सुचली. त्यानुसार त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिले आणि यातून अधिकचा रोजगार मिळाला 
- हर्षदा टेमघरे, अभिनव बचतगट

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com