डिंगोरे येथे आदिवासी बांधवांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन

पराग जगताप
सोमवार, 2 जुलै 2018

ओतूर (पुणे) : डिंगोरे (ता.जुन्नर) येथे नुकताच आदिवासी बांधवांच्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव अंतर्गत आदिवासी बांधवांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

ओतूर (पुणे) : डिंगोरे (ता.जुन्नर) येथे नुकताच आदिवासी बांधवांच्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव अंतर्गत आदिवासी बांधवांच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे सदस्य तथा जिल्हा नियोजन समिती, पुणेचे सदस्य अंकुश आमले हे होते. तर जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, सहायक प्रकल्प अधिकारी रामभाऊ पंढुरे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी दिपक कालेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बबन तांबे, पंचायत समिती सदस्य नंदा बनकर, आदिवासी भागातील सामाजिक कार्यकर्ते बुधाजी शिंगाडे, माजी पं.स.सदस्य पंडित मेमाणे तसेच पश्चिम पट्यातील आजी माजी सरपंच, लाभधारक उपस्थित होते.

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांनी असे मेळावे घेऊन जास्तीत जास्त योजनेची प्रसिध्दी करुन नागरिकांना लाभ मिळावा म्हणुन केलेल्या आवाहना मुळे आतापर्यंत  सात तालुक्यात दहा पेक्षा जास्त मेळावे घेण्यात आले आहे.डिंगोर येथिल मेळाव्यात बेरजगार युवकांकरीता रोजगार उपलब्ध करुन देणे, तसेच अनुसुचित जमातीच्या बेरोजगार युवकांकरीता इनवोल्युट इन्सि्टट्युट ऑफ टेक्लिकल ट्रेनिंग प्रा.लि.चाकण येथे एकुण 61 बेरोजगार युवकांची नोंदणी इलेक्ट्रीकल आणि मेकॅनिकल करीता नोंदणी केली गेली.तसेच युनिक डेल्टा सेक्युरीटी, पुणे यांनी एकुण 10 युवकांना सुरक्षा रक्षक करिता प्रशिक्षण घेण्यासाठी आदेश दिले, प्रथम एज्युकेशन फाऊन्डेशन,मुंबई संस्थे अंतर्गत एकूण 20 युवकांची नोंदणी झाली.या व्यतिरिक्त प्रकल्प कार्यालयाच्या स्तरांवर 64 बेरोजगार युवकांची नोंदणी झाली. तसेच वैयक्तिक लाभार्थींची 104 लाभार्थींनी योजने करीता नोंदणी केली असुन एकुण 259 लाभधारकांना या मेळाव्या अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

अध्यक्षीय मनोगतात आमले यानी या उपक्रमाचे कौतुक करुन प्रकल्प कार्यालयाने  आदिवासी बांधवासाठी राबविण्यात येणार्या विविध योजनाचा लाभ आदिवासी समाजाला मिळवुन द्यावा तसेच विविध ठिकाणी असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन द्याव्या तसेच पुढील काळातही असेच कार्यक्रम राबवावे असे संयोजकाना सुचित केले.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुंडलिक दाते यानी केले व आभार वरिष्ठ आदिवासी विकास निरिक्षक विठ्ठल चव्हाण यांनी मानले.

Web Title: organised meet for tribal community in dingore junnar