विश्र्व मराठी परिषदेच्या वतीने ‘साहित्य संस्कृती जागर परिक्रमे’चे आयोजन

विश्र्व मराठी परिषदेच्या वतीने ‘साहित्य संस्कृती जागर परिक्रमे’चे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांना राज्यातील भौगोलिक, सांस्कृतिक माहिती मिळावी हा या मागचा मुख्य उद्देश आहे.
Vishwa Marathi Parishad
Vishwa Marathi ParishadSakal
Summary

विश्र्व मराठी परिषदेच्या वतीने ‘साहित्य संस्कृती जागर परिक्रमे’चे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांना राज्यातील भौगोलिक, सांस्कृतिक माहिती मिळावी हा या मागचा मुख्य उद्देश आहे.

पुणे - विश्र्व मराठी परिषदेच्या वतीने ‘साहित्य संस्कृती जागर परिक्रमे’चे आयोजन करण्यात आले आहे. तरुणांना राज्यातील भौगोलिक, सांस्कृतिक माहिती मिळावी हा या मागचा मुख्य उद्देश आहे. या परिक्रमेची संकल्पना संस्थापक अध्यक्ष प्र. क्षितिज पाटुकले यांची असून राज्यभरातील युवक-युवतींना या परिक्रमेमध्ये सहभाग घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही. तसेच त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था परिषदेतर्फे केली जाणार असल्याची माहिती परिषदेचे संस्थापक संचालक अनिल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या प्रसंगी उपक्रमाच्या संयोजक स्‍वाती यादव, प्रा. अनिकेत पाटील आदी उपस्थित होते. यावेळी कुलकर्णी म्हणाले, ‘ही परिक्रमा २९ ऑक्‍टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. याची सुरवात सुभा प्रभनवल्लीपासून होणार आहे. तसेच खोरनिनको येथील मुचकुंदी नदीवरील धरण, बल्लाळेश्र्वर मंदिर, शिवकालीन गढी, वेरवली, लांजा, ओणी, राजापूरची गंगा, उन्हाळे येथील गरम पाण्याचे झरे आदी स्थळांना भेट दिली जाणार आहे.

त्यानंतर हा उपक्रम राजापूर येथील धूतपापेश्र्वर मंदिर येथे पूर्ण होईल. परिक्रमेदरम्यान दररोज सुमारे १२ ते १५ किलोमीटर चालण्याचा हा उपक्रम असून यामध्ये चारुदत्त आफळे, ज्येष्ठ कवी म.भा.चव्हाण, लेखिका नीलिमा बोरवणकर आदी सहभाग घेत वैचारिक गप्पा, कलांचे सादरीकरण अशा पद्धतीने तरुणांचे मार्गदर्शन करतील.’

राज्यातील सर्व जिल्ह्यांमधून १२५ युवक युवतींची परिक्रमेसाठी निवड केली जाणार असून यामध्ये सहभाग घेण्यासाठी इच्छुक युवक-युवतींना https://www.vishwamarathiparishad.org/ssjparikrama या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन यावेळी स्‍वाती यादव यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com