वडगाव कांदळीत बैलगाड्यांच्या शर्यतींचे आयोजन; रामदास पवार

वडगाव कांदळीचे सरपंच रामदास पवार
Bullock cart race
Bullock cart raceesakal

आळेफाटा : वडगाव कांदळीत बैलगाड्यांच्या शर्यतींचे आयोजन वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत बिरोबा महाराज यात्रेनिमित्त भव्य अशा बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत हा यात्रा उत्सव पार पडणार असल्याची माहिती वडगाव कांदळीचे सरपंच रामदास पवार यांनी दिली. रविवार दि. १मे रोजी सकाळी ८ वाजल्यापासून भव्य अशा बैलगाड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून प्रथम क्रमांकाच्या गाड्यास ५५५५५ रुपये, द्वितीय क्रमांकाच्या गाड्यास ४४४४४ रुपये ,तृतीय क्रमांकासाठी ३३३३३ रुपये तर चतुर्थ क्रमांकासाठी २२२२२ रुपये इनाम ठेवण्यात आला आहे.

तसेच फळी फोड गाड्यांसाठी मोठ्या प्रमाणात वैयक्तिक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. वडगाव कांदळीच्या घाटामध्ये जुन्नर तालुक्यासह आंबेगाव, खेड ,शिरूर, मावळ ,पारनेर, संगमनेर, अकोले या तालुक्यातून मोठ्या प्रमाणात बैलगाडे येत असतात .जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध असा हा बैलगाडा घाट असून मोठ्या प्रमाणात लोक शर्यती पाहण्यासाठी या ठिकाणी येत असतात . कोरोनानंतर तसेच शर्यती बंदीनंतर प्रथमच वडगाव कांदळी येथे बैलगाड्यांची शर्यत पहावयास मिळणार असल्याने परिसरातील लोकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

बैलगाड्यांच्या शर्यतीनंतर रविवारी १ मे रोजी रात्री १० वाजता मनोरंजनासाठी कै. तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा चा कार्यक्रम आयोजित केला आहे तर सोमवारी २ मे रोजी दुपारी३ ते ६ या वेळेत कुस्त्यांच्या भव्य जंगी आखाड्याचे आयोजन केले आहे त्यासाठी जास्तीत जास्त पहिलवान यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com