इंदापूर तालुक्यात शरद पवार यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन

राजकुमार थोरात 
रविवार, 15 एप्रिल 2018

येथे शाहु-फुले-आंबेडकर ग्रामअभ्यसिकेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या दोन्ही इमारतीचा उद्घाटन माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सोमवार (ता. 30) रोजी करण्यात येणार आहे.

वालचंदनगर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, माजी केंद्रिय मंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सोमवार (ता. 30) रोजी अंथुर्णे (ता.इंदापूर) येथे भव्य शेतकरी मेळावा, भरणेवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय व शाहु-फुले-आंबेडकर ग्रामअभ्यसिकेच्या इमारतीचा उद्घाटन होणार असल्याचे माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

भरणेवाडी येथे जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुमारे सव्वातीन कोटी रुपये खर्चुन जिल्ह्यातील सर्वात मोठी व अद्यावत ग्रामसचिवालयाच्या सुसज्ज इमारतीचे काम पूर्ण झाले अाहे. या ग्राम सचिवालयाच्या इमारतीमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व तंटामुक्त अध्यक्षांकरिता वेगवेगळी कार्यालये बनवण्यात आली असून कार्यालयीन कामकाजाकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या महिला व पुरुष सदस्यांकरिता वेगवेगळा बैठक कक्ष उभारण्यात आला आहे. ग्रामसचिवालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी प्रतिक्षालय बनवण्यात आला असून बाहेरगावाहून येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृहाची सोय करण्यात आली आहे.

गावातील युवकांना व्यायाम करता येण्यासाठी सुसज्ज व्यायमशाळा उभारण्यात आली असून येथे शाहु-फुले-आंबेडकर ग्रामअभ्यसिकेच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या दोन्ही इमारतीचा उद्घाटन माजी केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते सोमवार (ता. 30) रोजी करण्यात येणार आहे. तसेच यावेळी भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला असून पवार मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
अंथुर्णे येथे होणाऱ्या शेतकरी मेळाव्याला राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, विजयसिंह मोहिते पाटील, संजय दिना पाटील, सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आमदार जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, दिलीप सोपल, बबन शिंदे, शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्र राजे भाेसले, राणा पाटील, बाळासाहेब पाटील, राहुल मोटे, भाऊसाहेब चिखलीकर पाटील, राहुल जगताप, संग्राम जगताप, वैभव पिचड, दीपक चव्हाण, पांडुरंग बडोदा, प्रदीप नाईक, संदीप नाईक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात, झेडपी अध्यक्ष विश्‍वास देवकाते, झेडपी बांधकाम सभापती प्रवीण माने उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Organizing a grand farmers rally in the presence of Sharad Pawar in Indapur taluka