पुण्यात मातंग संघर्ष महामोर्चाचे आयोजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

पुणे : मातंग समाजावर झालेल्या अन्याय अत्याचारांच्या घटनामध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभुमीवर आज (ता.21) पुण्यात या विरोधात मातंग संघर्ष महामोर्चा काढण्यात आला. 

पुणे : मातंग समाजावर झालेल्या अन्याय अत्याचारांच्या घटनामध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभुमीवर आज (ता.21) पुण्यात या विरोधात मातंग संघर्ष महामोर्चा काढण्यात आला. 

पुण्यातील सारसबागेपासून मोर्चाला सुरवात झाली, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या येथे हा मोर्चाचा समारोप झाला. संविधान उद्देशिका वाचनाने मोर्चाची सुरवात झाली. मोठ्या संख्येने मातंग समाजातील बांधव न्यायासाठी या महामोर्चात सहभागी झाले. महिला मोर्चाच्या अग्रस्थानी होत्या. 

लातूर जिल्ह्यात नवरदेवाने मारुतीमंदिरामध्ये प्रवेश केला त्यामुळे महिलांसह वऱ्हाडाला अमानुषपणे मारहाण, जळगाव जिल्ह्यात दोन किशोरवयीन मुले विहरीत पोहले म्हणुन अमानुष मारहाण करण्यात आली, पुणे जिल्ह्यातील भिमाकोरेगांव दंगलीची मुख्य साक्षीदार व फिर्यादी असल्यामुळे पुजा सकट या तरुणीचा खुन करण्यात आला... अशा काही घटनांचा गेल्या काही दिवसांमध्ये समोर आल्या आहेत. मातंग समाजावर होणाऱ्या अन्यायाचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि न्याय मिळण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.

Web Title: Organizing Mathang Sangham Maha Morcha in Pune