बचत गटांच्या यशोगाथांवर राज्यस्तरीय लघुपट, माहितीपट स्पर्धेचे आयोजन

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या यशोगाथांवर आता लघुपट आणि माहितीपटांची निर्मिती केली जाणार आहे.
self help group
self help groupe sakal
Summary

महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या यशोगाथांवर आता लघुपट आणि माहितीपटांची निर्मिती केली जाणार आहे.

पुणे - महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या यशोगाथांवर आता लघुपट आणि माहितीपटांची निर्मिती केली जाणार आहे. महिला बचत गटांच्या यशोगाथा या दृकश्राव्य स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणे, हा लघुपट निर्मितीमागचा हेतू असणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफीत निर्मितीच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत राज्यात प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या लघुपटाला रोख तीन लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे.

या राज्यस्तरीय लघुपट व माहितीपट आणि चित्रफीत निर्मितीच्या स्पर्धेत इच्छुकांना येत्या ३० जूनपर्यंत सहभागी होता येणार आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. त्यामुळे यामध्ये व्यावसायिक, हौशी चित्रपट निर्माते, व्हिडिओ निर्माते व यु ट्यूब ब्लॉगर हे सहभागी होऊ शकणार असल्याचे उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ हेमंत वसेकर यांनी सांगितले.

या स्पर्धेतील राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास तीन, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास दोन लाख आणि तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास १ लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. याशिवाय ५० हजार रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिकही दिले जाणार आहे. केंद्र सरकारच्यावतीने राज्यात सन २०११ पासून व पुणे जिल्ह्यात सन २०१८ पासून पंडित दीनदयाल अंत्योदय राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) राबविले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे, त्यांच्या उत्पादनांची विक्री वाढवून बचत गटांच्या महिलांना आर्थिक उत्पन्न वाढीचे स्रोत निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या स्पर्धेत जिल्हास्तरावर सहभागी झालेल्या एकूण स्पर्धकांपैकी उत्कृष्ट ५ स्पर्धकांना जिल्हा कक्षाकडून सन्मानपत्र देण्यात येणार आहे. शिवाय त्यांच्या चित्रफिती राज्य कक्षाकडे पाठविण्यात येणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com