बारामती मराठा संवाद यात्राचे आयोजन

मिलिंद संगई
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

बारामती शहर - मराठा क्रांती मोर्चा दरम्यान काही बाहेरच्या समाजकंटकांनी हिंसक वळण लावले, मात्र समाजामध्ये सुसंवाद प्रस्थापित व्हावा या उद्देशाने बारामतीतून मराठा संवाद यात्रा आयोजित केली जाणार आहे. या यात्रेचे प्रमुख प्रशांत नाना सातव यांनी आज बारामतीत पत्रकारांना या बाबत माहिती दिली. 

मध्यतंरीच्या काळात मराठा मोर्चा दरम्यान काही हिंसक घटना घडल्या, मात्र मराठा समाजाने आजवर काढलेले सर्वच मोर्चे शांततेच्या मार्गानेच काढलेले होते. त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही समाजविघातक प्रवृत्तींनी केला. या पुढील काळात समाजामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी व सलोखा कायम राहावा या साठी सर्वच घटकांशी संवाद साधण्याच्या उद्देशाने संवाद रथाच्या माध्यमातून 5 ते 9 ऑगस्ट दरम्यान बारामती ते मुंबई अशी मराठा संवाद यात्रा आयोजित केली आहे. 

बारामतीतील शिवाजी उद्यान येथून या यात्रेस प्रारंभ होणार असून 6 रोजी सासवड, 7 ऑगस्टला पिंपरी चिंचवड, 8 रोजी नवी मुंबईला मुक्काम करुन संवाद यात्रेचा समारोप 9 ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर केला जाणार आहे. माहिती पत्रकांचे वाटप, आरक्षण मोहिमेत शहिद झालेल्यांना श्रध्दांजली, जागृती व प्रबोधन असे उपक्रम या संवाद यात्रेतून केले जाणार आहे, ही यात्रा पक्षविरहीत असून समाजाच्या सर्व घटकातील लोक यात सहभागी होऊ शकतात, असे प्रशांत सातव यांनी सांगितले. 

सेव्ह मराठा सेफ मराठा....
गेल्या काही दिवसातील पार्श्वभूमी विचारात घेता सेव्ह मराठा सेफ मराठा ही टॅग लाईन घेऊन ही संवाद यात्रा राज्याच्या विविध भागातून मुंबईपर्यंत मार्गक्रमण करणार आहे.

Web Title: Organizing a tour of Baramati Maratha