पिरंगुट येथे शिवकालीन पारंपारिक खेळांचे आयोजन

pirangut
pirangut

पिरंगुट - येथील सरनौबत नरवीर पिलाजी गोळे प्रतिष्ठान व आखिल गोळे आळी मित्र मंडळ यांच्यावतीने ही शिवकालीन खेळाची परंपरा तब्बल सुमारे सव्वाशे वर्षांनी पुन्हा सुरू करण्यात आली. यामध्ये दगडी गोटी उचलणे स्पर्धेत सौरभ अनिल गोळे अजिंक्य ठरला. अजिंक्यने सलग पंचवीस बैठकांचा उच्चांक करून ऐतिहासिक मानाचे चांदीचे कडे पटकाविले तर कडवी झुंज देताना रत्नागिरीच्या लक्ष्मण कासारने १६ बैठका मारून प्रेक्षकांची मने जिंकली. स्पर्धेत सव्हीस जणांनी सहभाग घेतला. पिरंगुटला १६७० सालची ७८ किलो वजनाची दगडी गोटी आहे. 

शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि हिंदवी स्वराज्याचे पायदळ प्रमुख सरनौबत नरवीर पिलाजी गोळे यांची कर्मभूमी व समाधीस्थळ म्हणजे पिरंगुट नगरी. येथे दगडी गोटी उचलण्याची परंपरा १६७०  ते १८९७ पर्यंत अव्याहत चालू  होती. प्लेगच्या साथीमुळे बंद झालेली ही परंपरा यावर्षी होळीच्या दिवशी सुरू केली. शिवाजी महाराजांच्या कालखंडात स्वराज्यात गावोगावी होळीच्या दिवशी मर्द मावळे होळी पेटवल्यावर मंदिरासमोर दगडी गोटी उचलून विक्रमी बैठका मारून चांदीचे कडे मिळवत असे. हीच खंडित झालेली प्रथा सरनौबत पिलाजी गोळे यांच्या वंशजांनी पुन्हा सुरू केली. 

प्रमुख पाहुणे म्हणून जाधव घराण्याचे वंशज गणेश जाधव उपस्थित होते. यावेळी छत्रपती पुरस्कार विजेते नितिन म्हाळसकर, स्वाती गोळे, राजाभाऊ कुलकर्णी, सुमित चव्हाण, नितीन चव्हाण, विशाल शिंदे, विलास मोरे, सचिन ढोरे, हनुमंत जांभुळकर, सिद्धेश ढोरे, सुधीर इंगवले, भरतराजे पाटील, विक्रम पवार, दिनेश बामनकर, लक्ष्मण गोळे,   एकनाथ गोळे, दशरथ गोळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com